बेळगाव : कुडची-बागलकोट रेल्वे मार्गाच्या कामाला मिळणार गती :  रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी

बेळगाव : कुडची-बागलकोट रेल्वे मार्गाच्या कामाला मिळणार गती : रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : 'नियोजित कुडची-बागलकोट रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करणे आणि संपादित केलेली जमीन रेल्वे विभागाच्या ताब्यात देणे' ही रेल्वे विभागाची पहिली प्राथमिकता आहे. भूसंपादनाचे काम पूर्ण होताच नियोजित रेल्वेमार्गाच्या कामाला गती मिळेल, असा विश्वास रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी व्यक्त केला आहे. शनिवारी कुडची (रायबाग तालुका) ते बागलकोट नव्या रेल्वेमार्गाच्या संदर्भात बेळगाव व बागलकोट जिल्ह्यातील अधिकारी आणि रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत अंगडी यांनी नियोजित रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी पोषक असलेल्या जमिनी बाबत सविस्तरपणे चर्चा केली.
त्याच बरोबर दोन्ही जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना भूसंपादनाची प्रक्रिया लवकरात लवकर आणि योग्य पद्धतीने पार पाडावी याबाबत सूचनाही केल्या. रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रशासनाशी समन्वय साधून आवश्यक असलेल्या जमिनी बाबत योग्य ती प्रक्रिया पार पाडावी असेही अंगडी यांनी स्पष्ट केले. दक्षिण पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. सिंग यांनी प्रकल्पाला उशीर झाला आहे, त्यामुळे उपलब्ध अनुदान व भूसंपादन प्रक्रिया पार पाडणे आवश्यक असल्याचे सांगितले.
आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी रायबाग रेल्वे स्टेशन संदर्भात सुचना मांडल्या. आमदार सिद्दु सवदी व अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांच्यासह महसूल, वन व रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
Project Name - Bagalkot-Kudachi Railway Line project
Project Brief - The project involves development of Bagalkot-Kudachi railway line in length of 142 km in Karnataka.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : कुडची-बागलकोट रेल्वे मार्गाच्या कामाला मिळणार गती : रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm