बेळगाव : या युवकांचे हे काम 'त्या' युवकांनाही लाजवेल, VIDEO VIRAL झाल्यानंतर रणगाड्याची स्वच्छता

बेळगाव : या युवकांचे हे काम 'त्या' युवकांनाही लाजवेल, VIDEO VIRAL झाल्यानंतर रणगाड्याची स्वच्छता

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव शहरातील नानावडी येथील रणगाडा (Army Tank) व परिसरात युवकांनी स्वच्छता मोहीम राबवली. या ऐतिहासिक रणगाड्यात आतल्या भागात प्लास्टिक कचरा, जेवणानंतर टाकलेल्या पञावळ्या, दारूचे ग्लास, दारूच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात पडलेल्या होता. हा सर्व भाग तरुणांनी स्वच्छ करून त्या ठिकाणी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी बोर्ड लावला. बेळगाव येथील रणगाडा अद्यापही धुळ खात पडत होता.

युवकांनी केली स्वच्छता : स्वच्छ सुंदर धेय्याने अखंड कार्यरत असलेल्या या सर्व तरुणांच्या चेहऱ्यावर हा ऐतिहासिक रणगाडा स्वच्छ करण्यासाठी योगदान दिल्याचे समाधान पाहायला मिळाले. या ऐतिहासिक वास्तूची अवस्था पाहता त्या वेळी ती कशी असेल याचा अंदाज येतो. चारही बाजूंनी घाण पसरलेली असून आतही घाण होती. शेजारी घाण-कचरा पडलेला होता. स्वच्छता कार्यक्रमात बेळगावचे गोरक्षक नारू निलजकर याच्या नेतृत्वाखाली श्रीरामसेना हिंदूस्थान संघटनेचे कार्यकर्ते यश पाटील, रोहीत मुरकुटे, अभी कुराडे, प्रताप मोहिते, शुभम किल्लेकर व अनेक युवक सहभागी झाले होते. belgavkar.com कडुन या सर्व युवकांचे आभार व धन्यवाद
या रणगाड्याचा एक व्हिडोओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. व्हिडीओवर संतप्त प्रतिक्रीया उमटत होती. काहींना व्हिडिओमधुन दिला जाणारा मेसेज चांगला वाटला तर काही जणांनी व्हिडीओवर आक्षेप घेतला. कारण म्हणे अशाप्रकरचे व्हिडीओ बनवल्याने बेळगावची बदनामी होती. हा परिसर व वास्तूची विटबंना करणारे पण बेळगावचेच असतील. त्यानंतर या युवकांनी परिसराची स्वच्छता केली आहे.


19 डिसेंबर 1961 रोजी गोव्याला स्वातंत्र्य मिळाले. पोर्तुगिजांचे हिंदुस्थानातील 450 वर्षांचे राज्य समाप्त झाले. गोवा मुक्ती संग्रामासाठी वापरलेले रणगाडे अद्यापही मंडोळी येथे आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : या युवकांचे हे काम 'त्या' युवकांनाही लाजवेल, VIDEO VIRAL झाल्यानंतर रणगाड्याची स्वच्छता

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm