पेट्रोल थेट 10 रुपयांनी स्वस्त होणार?
'ही' आहेत या मागची महत्वाची कारणं...

belgavkar.com | belgaum | belgavkar

200 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल नाही

नववर्षात देशातील जनतेला पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कमोडिटी तज्ज्ञांच्या मते, जानेवारीच्या सुरुवातीला पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होऊ शकतात. यासोबतच सरकार करातही कपात करू शकते. त्यामुळे देशभरात इंधनाच्या किमती 10 रुपयांनी कमी होऊ शकतात. याचे कारण म्हणजे 9 महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 45 टक्क्यांनी घसरण झाली आहे. जी वर्षाच्या अखेरीस 50 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते. किंबहुना, जगभरात मंदीचं सावट असताना व्याजदर पुन्हा आक्रमकपणे वाढवले ​​जाऊ शकतात. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींवर दबाव दिसून येत आहे, जो येत्या काही दिवसांत कायम राहू शकतो.
कच्च्या तेलाचा दर वर्षातील नीचांकी पातळीवर पोहोचला
विदेशी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा घसरण झाली आहे. बुधवारी बाजार बंद होताना ब्रेंट कच्च्या तेलाच्या किमतीत अडीच टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली आहे, ज्यामुळे किंमत प्रति बॅरल 77.17 डॉलरवर पोहोचली आहे. दुसरीकडे, WTI च्या किमतीतही मोठी घसरण दिसून आली आहे. प्रति बॅरल 72.01 डॉलरवर आले आहेत. तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाची ही पातळी एका वर्षातील नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. येत्या काही दिवसांत त्यात आणखी घट होऊ शकते.
9 महिन्यांत कच्च्या तेलाच्या दरात 45 टक्क्यांनी घट
7 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीने विक्रमी उच्चांक गाठला होता. तेव्हापासून त्यात 45 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. 7 मार्च रोजी ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल 139.13 डॉलर होती, त्यानंतर आता ती प्रति बॅरल 77.17 डॉलरवर आली आहे. यादरम्यान त्यात 44.53 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. दुसरीकडे, WTI कच्च्या तेलाच्या किमतीत 9 महिन्यांत 44.82 टक्क्यांनी घसरण झाली आहे. 7 मार्च रोजी, WTI ची किंमत प्रति बॅरल 130.50 डॉलर इतकी होती.
किंमती 50 टक्क्यांपर्यंत घसरू शकतात
कच्च्या तेलाच्या दरात आणखी घसरण होऊ शकते, असे कमोडिटी तज्ज्ञांचे मत आहे. मार्चपर्यंत ब्रेंट क्रूड आणि डब्ल्यूटीआय 50 टक्क्यांनी खाली येऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत 70 ते 72 डॉलर प्रति बॅरल आणि डब्ल्यूटीआयची किंमत प्रति बॅरल 65 डॉलरपर्यंत खाली येऊ शकते.
काय कारणे आहेत?
केडिया अ‍ॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांच्या म्हणण्यानुसार, मंदीचा परिणाम जगभरात दिसून येत आहे आणि यूएस फेड आक्रमकपणे व्याजदरात 75 बेसिस पॉइंट्सने वाढ करू शकते असे संकेत आहेत. दुसरीकडे इराणसारख्या देशांवरून आर्थिक निर्बंध हटवण्यात आले आहेत, त्यामुळे तेल बाजारातील पुरवठा वाढला आहे. या कारणांमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत आहे.
10 रुपयांनी स्वस्त होऊ शकतं इंधन
आयआयएफएलचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी माहिती देताना सांगितले की, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सर्वसामान्यांना दोन प्रकारे दिलासा मिळू शकतो. पहिला म्हणजे केंद्र आणि राज्य सरकार कर कमी करू शकतात. मे महिन्यात केंद्र आणि राज्य सरकारनेही तेच केलं होतं. तेव्हापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. दुसरा मार्ग म्हणजे तेल विपणन कंपन्यांच्या किमती कमी करणे, जे खूप महत्त्वाचे आहे. OMC ने एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. ते म्हणाले की, नवीन वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 10 रुपयांची घट दिसून येईल.
भारतात पेट्रोल, डिझेल सर्वात महाग कुठे?
राजस्थानातील गंगानगर आणि हनुमानगड जिल्ह्यात सर्वाधिक महाग पेट्रोल आणि डिझेल विकले जात आहे. गंगानगरमध्ये पेट्रोल 113.48 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 98.24 रुपये प्रति लिटर आहे. तर हनुमानगड जिल्ह्यात पेट्रोल 112.54 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 97.39 रुपये प्रतिलिटर दरानं विकलं जात आहे.
भारतात सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल कुठे?
देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल पोर्ट ब्लेअरमध्ये विकले जात आहे, जिथे पेट्रोलची किंमत प्रति लीटर 84.10 रुपये आणि डिझेलची किंमत 79.74 रुपये प्रति लीटर आहे.
भारतात पेट्रोल, डिझेल महाग का?
उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर शुल्क जोडल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलची किंमत जवळपास दुप्पट होते. परकीय चलन दर तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमतींवर अवलंबून असल्यानं पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलतात.
200 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल नाही

दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर किमतीला विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर इतके आहे. तर चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

पेट्रोल थेट 10 रुपयांनी स्वस्त होणार? 'ही' आहेत या मागची महत्वाची कारणं...
200 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल नाही

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm