बेळगाव : 'तो' धोकादायक वृक्ष हटविला

बेळगाव : 'तो' धोकादायक वृक्ष हटविला

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस रोडवर वाळलेल्या अवस्थेत भला मोठा वृक्ष रेल्वे रुळाच्या दिशेने कलला होता. सदर वृक्ष सोमवारी वनखात्याने हटवला. यासाठी फेसबुक फ्रेन्डस् सर्कलचे सहाय्य लाभले. काँग्रेस रोड अरुण थिएटर व एसबीआय बँकसमोर हा धोकादायक वृक्ष होता. या वृक्षाशेजारील रूळावरून रेल्वे धावताना वृक्ष एका बाजूला हलत होता. फेसबुक फ्रेन्डस् सर्कलचे संतोष दरेकर यांनी हा प्रकार पाहून लागलीच वनखात्याला माहिती दिली.
पोलिस , वनखात्याच्यामदतीने तातडीने सदर वृक्ष हटवण्यात आला. यासाठी वनखात्याचे मंजुनाथ शिगेहळ्ळी, रमेश बिरादार, पोलिस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, आप्पाजी नरसिंगन्नवर, सिद्धय्या हिरेमठ यांचे सहकार्य लाभले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : 'तो' धोकादायक वृक्ष हटविला

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm