गुरुपौर्णिमेच्या च्या मुहूर्तावर खडा पहारा योजनेची नोंदणी

गुरुपौर्णिमेच्या च्या मुहूर्तावर खडा पहारा योजनेची नोंदणी

belgavkar.com | belgaum | belgavkar

किल्ले रायगड येथे स्थापित होणाऱ्या 32 मण सुवर्ण सिंहासन

किल्ले रायगड येथे स्थापित होणाऱ्या 32 मण सुवर्ण सिंहासनाच्या रक्षणासाठी खडा पहारा योजनेची नोंदणी गुरुपौर्णिमेच्या च्या मुहूर्तावर ताशीलदार गल्ली विभागातुन सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच पातशाह्या मातीत गाडून हिंदवी स्वराज्याचे तक्त निर्माण केले. 32 मण सुवर्ण सिंहासन निर्माण करून राज्याभिषेक करून घेतला. कालांतराने ते सिंहासन मोघलांनी नष्ट केले. संभाजीराव भिडे गुरुजींच्या संकल्पनेतून ते पुन्हा स्थापित करण्याचा संकल्प श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानने केला आहे. हे सिंहासन निर्माण झाल्यानंतर जगाचा हिंदुस्थानकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून जाईल.

हे सिंहासन निर्माण झाल्यानंतर त्याच्या रक्षणासाठी श्री शिवप्रतिष्ठान चे धारकरी खडा पहारा देण्यासाठी सज्ज आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक तालुक्यातील 1 तुकडी दररोज रायगड येथे पहारा देण्यासाठी सज्ज असेल, असे किरण गावडे यांनी या वेळी सांगितले. आज गुरू पौर्णिमेचे औचित्य साधून बेळगाव येथून नोंदणी ला सुरवात करण्यात आली. तसेच बेळगाव च्या प्रत्येक विभागात ही नोंदणी करण्यात येणार आहे. यामध्ये धारकर्यांनी व शिवभक्तांनी नोंदणी करावी असे ही आवाहन करण्यात आले.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बेळगाव
खडा पहारा नोंदणी
यावेळी जिल्हा प्रमुख किरण गावडे यांच्या सह शहर प्रमुख अजित जाधव, कार्यवाह विश्वनाथ पाटील, विभाग प्रमुख अनंत चौगुले, प्रमोद चौगुले, गजानन पवार, भूषण निर्मलकर, मनोहर चौगुले, स्वप्नील चौगुले, अंकुश जुवेकर, परशराम थोरले, प्रसाद थोरले, रमेश चौगुले, किरण बडवाणाचे, अंकुश केसरकर, सचिन पाटील, गिरीश खन्नूकर, गौरांग गेंजी, सुनील बिर्जे, नागेश कंग्राळकर यांनी रक्ताचा ठसा देऊन नोंदणी केली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

गुरुपौर्णिमेच्या च्या मुहूर्तावर खडा पहारा योजनेची नोंदणी
किल्ले रायगड येथे स्थापित होणाऱ्या 32 मण सुवर्ण सिंहासन

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm