1986 च्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमाला शैक्षणिक साहित्य देऊन सहकार्य...

1986 च्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमाला शैक्षणिक साहित्य देऊन सहकार्य...

belgavkar.com | belgaum | belgavkar

माणूस कितीही मोठा झाला तरीही शाळेच्या आठवणी सर्वानाच सुखावून जाणाऱ्या असतात. पण एकदा शाळेतून बाहेर पडल्यानंतर सर्व वर्गमित्र मैत्रिणी पुन्हा एकत्र येणे विरळच. पण ओढ असेल तर काहीही शक्य आहे आणि हे सत्यात उतरविले आहे बेननस्मित हायस्कुलच्या 1986 बॅच च्या वर्गमित्रांनी. आज ते सर्वजण विविध उपक्रम राबवीत एकत्र येत असतात. साधारण या मित्रमंडळी मधील बहुतेक जणांनी या वर्षी आपल्या वयाच्या 50 व्या वर्षात पदार्पण केले आहे. याचेच एक औचित्य साधून या माजी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमासाठी गरजू विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक साहित्य दिले. विशेष म्हणजे त्यांनी हे साहित्य देताना प्रत्येक वस्तू ही प्रत्येकी पन्नास प्रमाणे दिल्या आहेत.
काही मोजक्या माजी विद्यार्थी आणि युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. यावेळी बोलताना श्री सुनील मुरकुटे म्हणाले की, युवा समिती मागील 3 वर्षांपासून शैक्षणिक उपक्रम राबवीत आहे. ज्यावेळी आमच्या उपक्रमाची रूपरेषा ठरली तेव्हा सर्वात पहिल्यांदा युवा समितीच्या कार्याची दखल घेऊन युवा समितीच्या उपक्रमाला सहाय्य करण्याचे ठरले. त्या प्रमाणे आज हे साहित्य वितरित करण्यात येत आहे. राजू लोंढे यांनी आम्हा सर्व सर्व वर्गमित्रांच्या वतीने 50 व्या वर्षाचे निमित्त करून हा उपक्रम राबविला आणि समाजाने सुद्धा शैक्षणिक उपक्रमासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि पुढेही अशी मदत युवा समितीला करण्यात येईल असे सांगितले.
यावेळी अमर कारेकर, विश्वनाथ बड्डे, रजत कारेकर, ऋषिकेश कारेकर हे माजी विद्यार्थ्यांच्या वतीने उपस्थित होते. युवा समिती कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी उपक्रमाबद्दल माहिती देऊन माजी विद्यार्थी संघटनेचे आभार मानले. सदर कार्यक्रमाला सरचिटणीस श्रीकांत कदम, किरण हुद्दार, विनायक कावळे, सचिन केळवेकर, अंकुश केसरकर, आशीर्वाद सावंत आदी उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

1986 च्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमाला शैक्षणिक साहित्य देऊन सहकार्य...

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm