अयोध्येतील राम मंदिराच्या भुमिपूजनाची तारीख अखेर ठरली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवला प्रस्ताव

अयोध्येतील राम मंदिराच्या भुमिपूजनाची तारीख अखेर ठरली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवला प्रस्ताव

belgavkar.com | belgaum | belgavkar

राम मंदिराची उंची वाढवण्यात येणार असून यामध्ये 3 ऐवजी 5 घुमट

देशातील करोडो हिंदू लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीराम मंदिर उभारणी प्रकरणी आज ट्रस्टची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान मंदिर उभारण्याच्या कार्यापूर्वी भुमीपूजनासाठी तारीख ठरवली आहे. त्यानुसार येत्या 3 किंवा 5 ऑगस्ट रोजी राम मंदिर उभारण्याच्या कार्यापूर्वी भुमिपूजन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. भुमिपूजनासाठी ठरवण्यात आलेल्या तारखेचा प्रस्ताव आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यावर अंतिम निर्णय काय घेणार हे महत्वाचे ठरणार आहे. त्याचसोबर राम मंदिराच्या नकाशात ही बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल यांच्या अध्यक्षतेसाठी राम मंदिर प्रकरणीची बैठक जवळजवळ दीड तास पार पडली. तर भुमिपूजनाचा अंतिम निर्णय नरेंद्र मोदी घेतील असे ही ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी बैठकीनंतर मीडियाशी बातचीत करताना स्पष्ट केले आहे.
त्यांनी पुढे असे ही म्हटले की, देशाच्या सीमेवर अद्याप तणावासण काही प्रकरणे सुद्धा सुरु आहेत. भुमिपूजनाची तारीख ठरवण्यात आली असून ती पीएमओ यांना पाठवली आहे. तसेच सोमपुराकडूनच मंदिराची उभारण्यात येणार आहे. कारण सोमनाथ मंदिर सुद्धा त्यांनीच साकारले आहे. मंदिर उभारणीसाठी पैशांची कोणतीच कमतरता नसणार आहे. मंदिरासाठी 10 करोड लोक दान देणार आहेत.
राम मंदिर हे 161 फूट उंचीचे असणार असून यामध्ये 3 ऐवजी 5 घुमट तयार करण्यात येणार आहेत. तर नरेंद्र मोदी यांचे भुमिपूजनाबाबत उत्तर आल्यानंतर पुढील कामाला सुरुवात होणार आहे. ट्रस्टच्या बैठकीला 15 पैकी 12 ट्रस्टी यांनी उपस्थिती लावली होती. राम मंदिराची उभारणी करणे हे करोडो लोकांच इच्छा असल्याचे ही सांगण्यात आले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

अयोध्येतील राम मंदिराच्या भुमिपूजनाची तारीख अखेर ठरली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवला प्रस्ताव
राम मंदिराची उंची वाढवण्यात येणार असून यामध्ये 3 ऐवजी 5 घुमट

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm