कर्नाटक प्रदेश काॅग्रेसच्या अध्यक्षपदी डी. के. शिवकुमारांवर - कर्नाटक काॅग्रेसची जबाबदारी

कर्नाटक प्रदेश काॅग्रेसच्या अध्यक्षपदी डी. के. शिवकुमारांवर - कर्नाटक काॅग्रेसची जबाबदारी

belgavkar.com | belgaum | belgavkar

डीकेंच्या निवडीचे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले आहे.

काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार डी. के. शिवकुमार यांची कर्नाटक प्रदेश काॅग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. काॅग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे डीके अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात. कर्नाटकात बी. एस. येडियुरप्पा सरकार येण्यापूर्वी कर्नाटकात काॅग्रेस आणि जनता दलाचे संयुक्त सरकार सत्तेवर आले होते. काॅग्रेसला चांगले दिवस आणण्यामध्ये डीकेंचा मोठा सहभाग होता. मात्र सत्ता स्थापन करताना आमदारांना सांभाळण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच होती. आज मावळते प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडू राव यांनी तातडीने कर्नाटक काॅग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी डीके यांच्याकडे सोपविली.
यावेळी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासोबम पक्षाचे खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डीकेंच्या निवडीचे राज्यातील काॅग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले आहे. काॅग्रेस हा कॅडरबेस असलेला पक्ष आहे. कर्नाटकातील काॅग्रेसला अधिक मजबूत करण्याबरोबरच प्रत्येक गावात पक्षाला नेण्याचा निर्धार डीके यांनी केला आहे. प्रदेश काॅग्रेसचे वजनदार नेते असलेल्या डीकेवर मध्यतंरी ईडीने चौकशी केली होती. त्यांना अटकही झाली होती. मात्र ते डगमगले नाही. वेळ आली तेव्हा ते तुरूंगातही गेले. मात्र त्यांना जेव्हा अटक झाली तेव्हा मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी त्यांची बाजू घेतली होती. त्यांना अटक व्हायला नको होती असेही त्यांनी बोलावून दाखविले होते.
ईडीने अटक केल्यानंतर पुढे काही दिवसात त्यांची सुटका झाली पण, त्यांनी कधीही पक्षाविरोधात ब्र काढला नाही. त्यावेळी काॅग्रेसचे नेते राहुल गांधी, सोनिया गांधीही त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहिले होते. कर्नाटक काॅग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद टोकाचे असले तरी डीके हे सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व आहेत. सर्व गटातटाशी त्यांचे चांगले जमते. ते स्वत:त कनकपूर विधानसभा मतदारसंघातून सातवेळा आमदार म्हणून निवडून आले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

कर्नाटक प्रदेश काॅग्रेसच्या अध्यक्षपदी डी. के. शिवकुमारांवर - कर्नाटक काॅग्रेसची जबाबदारी
डीकेंच्या निवडीचे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले आहे.

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm