बेळगाव : आर्थिक संकटात सापडलेल्यांना विशेष पॅकेज जाहीर करा - सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची मागणी

बेळगाव : आर्थिक संकटात सापडलेल्यांना विशेष पॅकेज जाहीर करा - सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची मागणी

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : आज सोमवारी (29 जून) बेळगाव सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांची भेट घेऊन गणेशोत्सव संदर्भात निवेदन दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात यंदाचा श्री गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय जर शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला तर या उत्सवावर अवलंबून असणाऱ्या गणेश मूर्ती कारखानदार, उद्योजक व कामगारांवर आर्थिक संकट येणार असल्यामुळे त्यांच्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनाला स्वीकार करत पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेऊ आणि मदत करू, असे आश्वासन दिले आहे. सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे रमाकांत कोंडुस्कर, मालोजी अष्टेकर, किरण जाधव, मदन बामणे, विकास कलघटगी, गणेश दड्डीकर आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : आर्थिक संकटात सापडलेल्यांना विशेष पॅकेज जाहीर करा - सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची मागणी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm