जानेवारी 2024 मध्ये खुले होणार राम मंदिर

जानेवारी 2024 मध्ये खुले होणार राम मंदिर

belgavkar.com | belgaum | belgavkar

जानेवारी 2024 मध्ये मकरसंक्रांतीला भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांची माहिती

  अयोध्या : अयोध्येतील भगवान राम मंदिर जानेवारी 2024 मध्ये मकरसंक्रांतीला प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. मंदिराची उभारणी करणाऱ्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले की, मुख्य मंदिराचे 40 टक्के आणि एकूण परिसराचे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. मंदिर उभारणीतील प्रगती आणि गुणवत्ता याबाबत आम्ही समाधानी आहोत. ते म्हणाले की, मंदिराचा तळमजला डिसेंबर 2023 पर्यंत तयार होईल. त्यानंतर 14 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी मंदिरात भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल आणि मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येईल. 
मंदिर उभारणीचे काम पाहता येईल अशा ठिकाणी मीडियाला जाण्याची परवानगी मंगळवारी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील शनिवारी ज्या ठिकाणाहून मंदिर उभारणीच्या कामाचा आढावा घेतला होता त्या ठिकाणीही पत्रकारांना नेण्यात आले. 
1,800 कोटींचा खर्च 
राय यांनी सांगितले की, मंदिर उभारणीसाठी 1800 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.  मंदिर परिसरात प्रमुख साधू, संत यांच्या मूर्तींसाठी जागा तयार करण्यात येईल. या योजनेंतर्गत मंदिर परिसरात 70 एकर भागात वाल्मिकी, केवट, शबरी, जटायू, सीता, विघ्नेश्वर आणि शेषावतार (लक्ष्मण) यांची मंदिरेही उभारण्यात येणार आहेत.  राजस्थानातील मकराना येथून पांढरे संगमरवर आणले जात असून मंदिराच्या गर्भगृहात त्यांचा उपयोग केला जाईल.  

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

जानेवारी 2024 मध्ये खुले होणार राम मंदिर
जानेवारी 2024 मध्ये मकरसंक्रांतीला भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm