गलवान खोऱ्यात भारत-चीन सीमेवर देशाचे रक्षण करताना धारातीर्थी पडलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली

गलवान खोऱ्यात भारत-चीन सीमेवर देशाचे रक्षण करताना धारातीर्थी पडलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली

belgavkar.com | belgaum | belgavkar

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बेळगाव तसेच समस्त बेळगावकर नागरिक

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बेळगाव तसेच समस्त बेळगावकर नागरिकांच्या वतीने छञपती श्री शिवाजी उद्यान येथे आज (रविवार 28 जून) रोजी गलवान खोऱ्यात भारत-चीन सीमेवर देशाचे रक्षण करत असताना वीरमरण पत्करलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिवादन करून भारतीय सैन्यातील धारातीर्थी पडलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी जिल्हा प्रमुख किरण गावडे यांनी चीन ने जगात कोरोना सारखा रोग पसरवून थैमान माजवले आहे. त्यातच आपला देश या महामारी विरुद्ध लढत असताना चीन ने देशाच्या सीमा ओलांडून घुसखोरी करून आपले सैनिक ठार केले याला प्रतिउत्तर म्हणून आपल्या सैनिकांनी 40 हुन अधिक चिन्यांना ठार मारले आहे. येणाऱ्या काळात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकावा.
गणेशचतुर्थी, दिवाळी तसेच इतर सणाच्यावेळी आणि आपल्या रोजच्या जीवनात सुध्दा चीनमधून येणारी कोणती ही वस्तू खरेदी न करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच सीमेवरील सैन्यदलातील कोणत्याही जवानाला वीरमरण प्राप्त झाले तर त्यांना कोणीही शहिद म्हणून संबोधू नये. कारण शहीद हा शब्द इस्लामसाठी शहादत म्हणून मरणाऱ्यांसाठी वापरण्यात येतो, अशी माहिती गुरुजींच्या आदेशानुसार देण्यात आली. त्यामुळे जवानांना शहिद न म्हणता धारातीर्थी, हुतात्मा, बलिदान किंवा वीरमरण प्राप्त झालेले संबोधावे असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा प्रमुख किरण गावडे यांनी केले.
यावेळी शहर कार्यवाहक विश्वनाथ पाटील, विभागप्रमुख पुंडलिक चव्हाण, भास्कर पाटील, अनंत चौगुले, किरण बडवाणाचे, चंदू चौगुले, युवराज पाटील, गजानन पवार, वेंकटेश पाटील, सचिन केळवेकर, अंकुश केसरकर, नामदेव पिसे, उमेश ताशीलदार, धनंजय पाटील, रमेश चौगुले, राजू कदम, प्रमोद चौगुले, किशोर पाटील,गजानन निलजकर, विजय कुंटे ,अमोल केसरकर, राम सुतार आदी उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

गलवान खोऱ्यात भारत-चीन सीमेवर देशाचे रक्षण करताना धारातीर्थी पडलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बेळगाव तसेच समस्त बेळगावकर नागरिक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm