बेळगाव : जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली - डीसीसी बँक

बेळगाव : जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली - डीसीसी बँक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची (District Co-operative Central Bank - DCC - डीसीसी) निवडणूक पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली असून, ही निवडणूक आता 27 ऑगस्टला होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सईदा आफ्रिनबानू बळ्ळारी यांनी दिली. 19 ऑगस्टपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. यापूर्वी जिल्हा मध्यवर्ती बँकेची 7 ऑगस्ट रोजी निवडणूक जाहीर करण्यात आली. आतापर्यंत या बँकेची निवडणूक दोन वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. त्याचबरोबर पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार काडाच्या उपप्रशासकीय अधिकारी जयश्री शिंत्रे यांची नियुक्ती करण्यात आली होती.
लॉकडाऊनमुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. सहकार खात्याकडून निवडणूक निर्णय जिल्हा मध्यवर्ती बँक अधिकारी म्हणून बिम्सच्या प्रशासकीय अधिकारी सईदा आफ्रिनबानू बळ्ळारी यांची नियुक्ती झाली. सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या आयुक्तांनी याबाबतचा आदेश काढला आहे. संपूर्ण जिल्ह्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागून आहे. 7 ऑगस्टला निवडणूक यापूर्वी जाहीर करण्यात आल्याने मोर्चे बांधणी सुरु होती. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी कच्ची मतदार यादी तयार केली जात आहे. यासाठी डीसीसी बँकेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सहकारी संघांना 30 जूनपूर्वी माहिती पुरविण्याचे आवाहन बँकेच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे. वेळत माहिती न दिल्यास संघ मतदानापासून वंचित राहील. अन् त्यास बँक जबाबदार राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
डीसीसी बँकेची निवडणूक 27 ऑगस्ट रोजी घेण्याचे निश्चित केले आहे. निवडणूक अधिकारी म्हणून सईदा यांनी कच्ची मतदार यादी तयार करण्यासंबंधीचे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. यात 31 मार्च 2020 च्या आधीची सदस्यांची थकबाकी, वसुली आदींच्या माहितीसह सहकारी संघ व बँकांना निवडणुकीशी संबंधीत सर्व माहिती द्यावी लागणार आहे. 30 जूनपूर्वी माहिती देणाऱ्या पतसंस्थांचीच नावनोंदणी केली जाणार आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली - डीसीसी बँक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm