लोंढा – मिरज मार्गावरील कृष्णा व मलप्रभा नदीवर आधुनिक यंत्रणा; मॉनिटरींग पध्दतीने माहिती मुख्य सर्व्हरद्वारे सर्व संबंधित यंत्रणाकडे

लोंढा – मिरज मार्गावरील कृष्णा व मलप्रभा नदीवर आधुनिक यंत्रणा;
मॉनिटरींग पध्दतीने माहिती मुख्य सर्व्हरद्वारे सर्व संबंधित यंत्रणाकडे

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : मिरज - लोंढा रेल्वे मार्गावरील पावसाळ्यात रेल्वेपुलांवरील पाण्याची पातळी समजाण्यासाठी कृष्णा व मलप्रभा नदीच्या पुलावर रेल्वे प्रशासनाकडून आधुनिक यंत्रणा बसविली आहे. यामुळे पाण्याची पातळी वाढताच त्याची माहिती रेल्वे विभागाला समजणार आहे. लोंढा – मिरज मार्गावरील मलप्रभा नदीवर गुंजी ते खानापूर दरम्यान तर कृष्णा नदीवर कुडची ते उगार खुर्द दरम्यान ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. पाणी वाढताच सायरन वाजून धोक्याची घंटा वाजणार आहे. त्याची माहिती एसएमएसच्या माध्यमातून रेल्वेला मिळणार आहे.
इंटेलिजंट रिव्हर लेव्हल मॉनिटरिंग इन्स्ट्रमेंट या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या ठिकाणी तंत्रज्ञानाला वीजपुरवठा करणे शक्य नसल्याने सौरऊर्जेचा वापर करण्यात आला आहे. मागीलवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कृष्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे ही यंत्रणा यावर्षी उभारण्यात आली आहे. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर आणि मुख्य सर्व्हरवर याच्या सूचना जाणार आहेत. मिरज - लोंढा रेल्वे मार्गावरील पूल क्र. 44 वरील गुंजी आणि खानापूर रेल्वे स्टेशनमधील मलप्रभा नदीच्या पुलावर, त्याचबरोबर पूल क्र. 184 येथे कुडची आणि उगारखुर्द रेल्वे स्टेशनमधील कृष्णा नदीच्या पुलावर यंत्रणा बसवण्यात आली आहे.
यापूर्वी पुलावरील रंगवलेल्या आकड्यावरुन पाणी पातळी मोजून अहवाल पाठवण्यात येत होता. आता मॉनिटरींग पध्दतीने ही यंत्रणा बसवण्यात आल्याने पाणी पातळीची माहिती मुख्य सर्व्हरद्वारे सर्व संबंधित यंत्रणाकडे ही माहिती जाणार आहे. अंदाजे 10 लाख रुपये खर्च करून ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. रेल्वे अधिकारी विजय अगरवाल व कौशलकिशोर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
वीज पुरवठ्याच्या समस्येवर विजय मिळविण्यासाठी, सिस्टम सौर उर्जा पुरवठ्यावर तसेच सौर व मेन्स वीजपुरवठा एकत्रितपणे 72 तास कमीतकमी बॅटरी बॅकअपसह आणि कमीतकमी 4 बॅकअप आणि स्टोरेजसाठी तयार केलेल्या मेमरीमध्ये कार्य करते. पुल 24x7 च्या सुरक्षा देखरेखीसाठी नदी पातळीवरील देखरेखीची यंत्रणा बसविणे ही योग्य दिशेने एक पायरी आहे. सदर काम पी.सी.ई. श्री विजय अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सी.पी.डी. / बीडब्ल्यू यांच्या नेतृत्वात SWR च्या ब्रिज संस्थेने हाती घेतले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

लोंढा – मिरज मार्गावरील कृष्णा व मलप्रभा नदीवर आधुनिक यंत्रणा; मॉनिटरींग पध्दतीने माहिती मुख्य सर्व्हरद्वारे सर्व संबंधित यंत्रणाकडे

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm