स्पीडमध्ये असलेला पाळणा तुटला; ट्रॉली 5 फूट लांब उडाली आणि…. जत्रेत घडली भयानक दुर्घटना; थरारक व्हिडिओ

स्पीडमध्ये असलेला पाळणा तुटला;
ट्रॉली 5 फूट लांब उडाली आणि…. जत्रेत घडली भयानक दुर्घटना;
थरारक व्हिडिओ

belgavkar.com | belgaum | belgavkar

गाझियाबादमधील रामलीला मैदानावर भरलेल्या जत्रेत एक भयानक दुर्घटना घडला आहे. जत्रेतील पाळणा (ब्रेक डान्स) तुटला. या पाळण्याची ट्रॉली 5 फूट लांब उडाली आहे. या दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पाळणा तुटल्याने तीन मुलांसह 4 जण जखमी झाले आहेत. पाळणा तुटल्यानंतर मैदानात एकच धावपळ उडाली. जखमींना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास हा अपघात घडला. जत्रेतील ब्रेक डान्स या पाळण्यात मुलं राईडचा आनंद घेत होती.
हा पाळणा स्पीडमध्ये होता. अचानक ब्रेक डान्स स्विंगची ट्रॉली तुटली आणि ती 5 फूट अंतरावर जाऊन उलटली. हा अपघात एवढा भीषण होता की पाळणा 90 अंशाच्या कोनात वर उंच गेला आणि नंतर 5 फूट अंतरावर जाऊन पडला.
याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. पाळणा तुटल्यानंतर काही लहान मुलं पाळण्यातून खाली पडल्याचे व्हिडिओत दिसत आहे. हा पाळणा उडून बाजूला असलेल्या रेलिंगवर आदळल्याचेही व्हिडिओत दिसत आहे. या घटनेनेनंचर एकच गोंधळ उडाला. ब्रेक डान्स या पाळण्यात बसलेल्या आपल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी पालकांनी एकच धावाधाव केली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

स्पीडमध्ये असलेला पाळणा तुटला; ट्रॉली 5 फूट लांब उडाली आणि…. जत्रेत घडली भयानक दुर्घटना; थरारक व्हिडिओ

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm