कर्नाटक : एसडीपीआयबाबत घडामोडींनुसार कारवाई;

कर्नाटक : एसडीपीआयबाबत घडामोडींनुसार कारवाई;

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटक : केंद्राने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घातली आहे. परंतु ‘एसडीपीआय' या संघटनेने वेगळी भूमिका घेतली आहे. हा भारतीय निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत राजकीय पक्ष असल्याने केंद्र सरकारने त्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. आगामी काळात घडामोडी लक्षात घेऊन कारवाई केली जाईल, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.
पीएफआयवरील बंदी हा राजकीय स्टंट आणि निवडणुकीची खेळी असल्याच्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते बी. के. हरिप्रसाद यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, काँग्रेस नेत्याकडून आणखी काय अपेक्षा करता येईल. इतक्या वर्षात अनेक फुटीरतावादी कारवाया आणि हत्या झाल्या होत्या. सर्व काही त्यांच्या डोळ्यासमोर आहे. याशिवाय प्रतिबंधित संघटनेने दहशतवादी कारवायांचे समर्थन केले. काँग्रेसने सभागृहात आणि सभागृहाबाहेर पीएफआयवर बंदी घालण्याची मागणी केली होती.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

कर्नाटक : एसडीपीआयबाबत घडामोडींनुसार कारवाई;

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm