T20 विश्वचषकात टीम इंडियाकडून शेवटचा खेळताना दिसेल हा खेळाडू, करू शकतो निवृत्तीची घोषणा

T20 विश्वचषकात टीम इंडियाकडून शेवटचा खेळताना दिसेल हा खेळाडू, करू शकतो निवृत्तीची घोषणा

belgavkar.com | belgaum | belgavkar

या महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघामध्ये खेळाडूंची निवड करताना निवड समितीने युवा आणि अनुभवी खेळाडूंचा योग्य ताळमेळ राखला आहे. दरम्यान, या संघातील एक सिनियर खेळाडू त्याचा शेवटचा टी-20 विश्वचषक खेळताना दिसणार आहे. त्यानंतर तो त्याच्या निवृत्तीची घोषणा करू शकतो. हा खेळाडू म्हणजे दिनेश कार्तिक. दिनेश कार्तिकने प्रचंड मेहनत घेत सातत्यपूर्ण कामगिरी करत भारतीय संघात पुनरागमन केले आहे. त्याने यावर्षीच्या आयपीएलमध्ये धमाकेदार खेळ केला होता. त्यानंतर भारतीय संघात स्थान मिळाल्यापासून फिनिशरची भूमिका चोखपणे बजावत आहे.
37 वर्षिय दिनेश कार्तिक हा भारतीय संघातील सर्वात सिनियर खेळाडू आहे. तीन वर्षांनंतर त्याने भारतीय संघात पुनरागमन केले आहे. मात्र अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्याला रिषभ पंत कडून कडवी टक्कर मिळत आहे. अशा परिस्थितीत यंदाच्या टी-20 विश्वचषकानंतर दिनेश कार्तिक क्रिकेटला रामराम ठोकू शकतो. उल्लेखनीय बाब म्हणजे भारताने 2007 मध्ये जेव्हा पहिला टी-20 विश्वचषक जिंकला होता. तेव्हा. त्या संघामध्ये दिनेश कार्तिकचा समावेश होता. दिनेश कार्तिकने भारताकडून 26 कसोटी, 94 एकदिवसीय आणि 51 टी-20 सामने खेळले आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

T20 विश्वचषकात टीम इंडियाकडून शेवटचा खेळताना दिसेल हा खेळाडू, करू शकतो निवृत्तीची घोषणा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm