siddaramaiah-demand-rss-ban-unfortunate-basavaraj-bommai-cm-202210.jpeg | कर्नाटक : संघावर बंदीची मागणी दुर्दैवी | belgaum news | belgavkar बेळगावकर

कर्नाटक : संघावर बंदीची मागणी दुर्दैवी

belgavkar.com | belgaum | belgavkar

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

कर्नाटक : संघ ही देशभक्त आणि गरिबांना मदत करणारी संघटना आहे. जेव्हा देश संकटात सापडला, तेव्हा आरएसएस अनेक प्रकारे मदतीला आला. जी संघटना देशात देशभक्ती जागवते. दीनदुबळ्या, गरीब मुले, अनाथ यांच्यासाठी संघटना उभी राहते. अशा संघटनेवर बंदी घालण्याची मागणी करणे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. सिद्धरामय्या यांचे संघावर बंदी घालण्याचे वक्तव्य हे मोठे दुर्दैव आहे. त्यांच्या विधानाला कोणताही आधार नाही, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. ते हुबळी येथे बोलत होते.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी पीएफआयवर बंदी घालण्याच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले. पीएफआयवर बंदी का घातली, हे विचारण्याचा त्यांना कोणताही आधार नाही. यापूर्वी त्यांनी स्वतः पीएफआयवरील खटले मागे घेतले होते. ते लपविण्यासाठी संघावर बंदी घालण्याची ते मागणी करीत आहेत, असा प्रतिवाद त्यांनी केला.