belgaum-बेळगाव-current-mla-anil-benke-is-the-candidate-from-belgaum-north-constituency-belgavkar-belgaum-202210.jpg | बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघातून विद्यमान आमदार अनिल बेनके हेच उमेदवार | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघातून विद्यमान आमदार अनिल बेनके हेच उमेदवार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत चर्चा होत आहे. मात्र आगामी निवडणुकीसाठी बेळगाव उत्तर मतदारसंघातून विद्यमान आमदार अनिल बेनके हेच उमेदवार असतील, यामध्ये कोणताही बदल होणार नाही, असे स्पष्ट संकेत कर्नाटक प्रदेश भाजप अध्यक्ष नवीनकुमार कटिल यांनी दिले.
नवीनकुमार कटील बेळगावला आले असता त्यांनी उमेदवारीबाबत स्पष्ट संकेत दिले. आमदार बेनके यांना भाजप महानगर अध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्यानंतर विधानसभा निवडणुकीबाबत आमदार बेनके यांची उमेदवारी डावलणार की काय, अशी राजकीय गोटात चर्चा सुरू आहे. उत्तर मतदारसंघांमध्ये इच्छुकांची संख्याही मोठी आहे. यामुळे पत्रकारांनी कटिल यांना छेडले असता विद्यमान आमदारांच्या उमेदवारीमध्ये सध्यातरी कोणताही बदल करण्याचा विचार करत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.