Video : उत्तराखंडच्या 'केदारनाथ'मध्ये हिमस्खलन; निसर्गाचा रुद्रावतार कॅमेऱ्यात कैद

Video : उत्तराखंडच्या 'केदारनाथ'मध्ये हिमस्खलन;
निसर्गाचा रुद्रावतार कॅमेऱ्यात कैद

belgavkar.com | belgaum | belgavkar

केदारनाथ मंदिराजवळ पुन्हा एकदा हिमस्खलन झालं

उत्तराखंडच्या केदारनाथ मंदिराजवळ (Kedarnath Temple) पुन्हा एकदा हिमस्खलन झालं आहे. केदारनाथ धाममध्ये बर्फाचा डोंगर कोसळला आहे. मात्र, या हिमस्खलनात केदारनाथ मंदिराचं कोणतंही नुकसान झालं नाही ही दिलासादायक बाब आहे. श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे (Badrinath-Kedarnath Temple Committee) अध्यक्ष अजेंद्र यांनी याबाबत माहिती दिली. केदारनाथ धामजवळील या आधीच्या घटनेनंतर प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचं समोर आलं. हवामानातही बदल होताना दिसत आहेत. गेल्या आठवड्यातही केदारनाथ धामजवळ हिमस्खलनाचे भयानक दृश्य पाहायला मिळालं होतं.

विशेष म्हणजे, त्या दिवशीही कोणतंही नुकसान झालं नसल्याचं समोर आलं होतं. एका वृत्तसंस्थेनं केदारनाथ धाम परिसरात हिमस्खलनाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये भयानक दृश्य पाहायला मिळतं. केदारनाथ धामजवळील परिसरात असलेल्या टेकड्यांवरून बर्फाचे पर्वत किती वेगाने खाली येत आहेत, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. शुक्रवारीच चार धाम यात्रेला गेलेले बिहारमधील चार जण पर्वत तुटल्यामुळे उत्तरकाशीमध्ये अडकले होते. ज्या भागात बर्फ कोसळण्याचा तडाखा बसला आहे, तो भाग चोरबारी ग्लेशियर कॅचमेंट एरिया म्हणून ओळखला जातो. हे ठिकाण केदारनाथ मंदिर परिसरापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. गुरुवारी सायंकाळी 6.30 वाजता हे हिमस्खलन झालं आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

Video : उत्तराखंडच्या 'केदारनाथ'मध्ये हिमस्खलन; निसर्गाचा रुद्रावतार कॅमेऱ्यात कैद
केदारनाथ मंदिराजवळ पुन्हा एकदा हिमस्खलन झालं

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm