टीम इंडियासाठी खुशखबर; बुमराह T20 World Cup खेळणार..!

टीम इंडियासाठी खुशखबर;
बुमराह T20 World Cup खेळणार...!

belgavkar.com | belgaum | belgavkar

बुमराह अजूनही टी-20 विश्वचषकातून बाहेर पडलेला नाही : BCCI अध्यक्ष सौरव गांगुली

त्यामुळे बुमराहकडून खेळण्याची अपेक्षा केली जाऊ शकते.

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 World Cup आधी टीम इंडियासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अद्याप टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर गेला नाही. T20 विश्वचषकात खेळण्याच्या आशा अजूनही कायम आहेत. दोन आठवड्यांनंतर ही स्पर्धा ऑस्ट्रेलियात होणार आहे.
जसप्रीत बुमराह पाठदुखीच्या समस्येमुळे टी-20 विश्वचषकातून बाहेर पडल्याचे वृत्त आले होते. बुमराह यावर्षी दुखापतींशी सतत झुंज देत आहे. आधी तो आशिया कपमधून बाहेर पडला, त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलिया मालिकेत पुनरागमन केले. आता दक्षिण आफ्रिका मालिकेतूनही बाहेर आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी म्हटले आहे की, विश्वचषक सुरू होण्यास अजून वेळ आहे, त्यामुळे बुमराहकडून खेळण्याची अपेक्षा केली जाऊ शकते.
सौरव गांगुलीने एका वृत्तसंस्थेशी बोलतानाशी सांगितले की, जसप्रीत बुमराह वर्ल्ड कपमधून बाहेर पडलेला नाही. वर्ल्ड कप सुरू होण्याची वेळ आली आहे. आपण थांबले पाहिजे आणि घाईत काहीही बोलू नये. पाठदुखीच्या समस्येमुळे जसप्रीत बुमराह टी-20 विश्वचषकातून बाहेर पडल्याचे वृत्त आले होते.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेदरम्यानही बुमराहच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. बुमराह या मालिकेतील पहिला टी-20 सामना खेळू शकला नाही. यानंतर बुमराहने मालिकेतील दोन सामन्यांमध्ये खेळला. बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यातून बाहेर गेला. पाठदुखीमुळे बुमराहला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून वगळण्यात आल्याचे बीसीसीआयने अपडेट जारी केले.
बुमराहच्या टी-20 विश्वचषकात खेळण्याबाबत अद्याप परिस्थिती स्पष्ट झालेली नाही. टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला रवाना झाला तरी बुमराह पाकिस्तानविरुद्ध खेळू शकेल की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. बुमराह न खेळल्यास मोहम्मद शमी किंवा मोहम्मद सिराज यांचा टीम इंडियात समावेश केला जाऊ शकतो.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

टीम इंडियासाठी खुशखबर; बुमराह T20 World Cup खेळणार..!
बुमराह अजूनही टी-20 विश्वचषकातून बाहेर पडलेला नाही : BCCI अध्यक्ष सौरव गांगुली

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm