बेळगाव : कोगनोळी आरटीओवर लोकायुक्तचा छापा, पहिलीच मोठी कारवाई

बेळगाव : कोगनोळी आरटीओवर लोकायुक्तचा छापा, पहिलीच मोठी कारवाई

belgavkar.com | belgaum | belgavkar

3 लाख 62 हजार रुपयांची रोकड जप्त

एसीबी बंद करण्यात आल्यानंतर लोकायुक्त पोलिसांनी केलेली ही पहिलीच मोठी कारवाई

बेळगाव : कर्नाटक-महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील कोगनोळी येथील आरटीओच्या चेकपोस्टवर लोकायुक्त पोलिसांनी शुक्रवारी पहाटे 4 च्या दरम्यान छापा टाकला. वीस अधिकाऱ्यांनी शोधकार्य राबवत वाहन चालकाकडून बेकादेशीररीत्या वसूल केलेली सुमारे 3 लाख 62 हजार रुपयांची रोकड जप्त केली. लोकायुक्त पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे लाचखोर सरकारी बाबूंचे धाबे दणाणले आहेत. लोकायुक्त न्यायाधीश बी. एस. पाटील हे 24 जून रोजी विजापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी प्रादेशिक परिवहन खात्याच्या (आरटीओ) तपासणी नाक्यावर वाहन चालकाकडून बेकायदेशीररीत्या पैशांची वसुली केली जात आहे, अशा तक्रारी केल्या होत्या.
त्यामुळे त्यांनी स्वतः 30 जूनला या प्रकरणी फिर्याद दाखल करून संबंधित अधिकाऱ्यांना तपास करून अहवाल सादर करण्याची सूचना केली होती. त्यानुसार 28 सप्टेंबरला कर्नाटक लोकायुक्त कायदा कलम 10 नुसार सर्च वारंट जारी करण्यात आले. त्यामुळे शुक्रवारी लोकायुक्तचे अप्पर पोलिस महासंचालक प्रशांत कुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील आरटीओच्या 9 चेकपोस्टवर छापे टाकून तपासणी केली. लोकायुक्तच्या जिल्हा पोलिसप्रमुख यशोधा वंटगोडी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपअधीक्षक जे. रघू यांनी आपल्या 20 अधिकारी व कर्मचाऱ्यांसह पहाटे 4 च्या दरम्यान कोगनोळी येथील आरटीओच्या चेकपोस्टवर छापा टाकला. सायंकाळी उशिरार्यंत शोधमोहीम चालली.
त्यावेळी त्याठिकाणी सेवा बजावणाऱ्या पठाण आणि सुनील यांची लोकायुक्तांनी कसून चौकशी केली. चौकशीअंती वाहनचालकाकडून बेकायदा वसूल केलेले तसेच कोणत्याही प्रकारची पावती नसलेली सुमारी 3 लाख 62 हजार रुपयांची रोकड एका मोपेडच्या डिक्कीतून जप्त केली. एसीबी बंद करण्यात आल्यानंतर लोकायुक्त पोलिसांनी केलेली ही पहिलीच मोठी कारवाई आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : कोगनोळी आरटीओवर लोकायुक्तचा छापा, पहिलीच मोठी कारवाई
3 लाख 62 हजार रुपयांची रोकड जप्त

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm