belgaum-बेळगाव-service-center-owner-dies-due-to-electric-shock-belgavkar-belgaum-202210.jpg | बेळगाव : वीज धक्क्याने सर्व्हिसिंग सेंटर मालकाचा मृत्यू | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : वीज धक्क्याने सर्व्हिसिंग सेंटर मालकाचा मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : कुन्नूर (ता. निपाणी) येथील सर्व्हिसिंग सेंटरचे मालक राहुल दशरथ कोळी (वय 30) यांना विद्युत मोटारीचा धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलिसांत झाली. दहा वर्षांपासून राहुलचे कुन्नूर-मांगूर रोडला लागून श्रीराम सर्व्हिसिंग सेंटर आहे. ते नेहमीप्रमाणे सेंटरमध्ये काम करत होते.
दरम्यान सायंकाळी त्यांना विद्युत मोटारीचा धक्का बसल्याने जोराने बाजूला फेकल्याने जागीच मृत्यू झाला. त्याची माहिती निपाणी ग्रामीण पोलिसांना दिली. घटनास्थळी उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार, हवालदार प्रशांत कुदरी यांनी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला. राहुल यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे. राहुल यांच्या पत्नी प्रियांका यांनी याबाबतची पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार करत आहेत. राहुल कोळी नवरात्रोत्सव मंडळाचे कर्तव्यदक्ष सदस्य व मनमिळाऊ होते. ऐन दसऱ्यातच झालेल्या अकाली मृत्यूने येथे हळहळ व्यक्त होत आहे.