मस्तच...!
महागाईत स्वस्ताई, व्यावसायिक गॅस सिलिंडरचे भाव घटले, पण…;
भाव काय?

belgavkar.com | belgaum | belgavkar

19 किलोवाला कमर्शियल गॅस सिलिंडर 25.5 रुपयांनी स्वस्त

घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल नाही

एकीकडे महागाईचा आगडोंब उसळलेला असतानाच देशातील जनतेला त्यातून थोडा दिलासा देणारी बातमी आहे. सण उत्सवाच्या काळात गॅस सिलिंडरच्या किंमतीत घट करण्यात आली आहे. मात्र, ही घट केवळ व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी देण्यात आली आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार आजपासून 19 किलोवाला प्रत्येक कमर्शियल गॅस सिलिंडर 25.5 रुपयांनी स्वस्त झाला आहे. कोलताकात्यात त्याचे भाव 36.5 रुपयांनी, मुंबईत 32.5 रुपयांनी आणि चेन्नईत 35.5 रुपयांनी कमर्शियल गॅस सिलिंडरची किंमत कमी झाली आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरच्या दरांचा आढावा घेतला जातो. त्यानुसार हा आढावा घेऊन दर कमी करण्यात आले आहेत. नवे दर तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत.
IOCL नुसार, 1 ऑक्टोबरपासून दिल्लीत इंडेनच्या 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 25.5 रुपये, कोलकाता 36.5 रुपये, मुंबई 32.5 रुपये, चेन्नईमध्ये 35.5 रुपयांची कपात करण्यात आली आहे. 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.

दिल्लीत इंडेनचा 19 किलोचा सिलिंडर 1885 रुपयांऐवजी आता 1859.5 रुपयांना मिळणार आहे. तर कोलकात्यात 1995.50 रुपयांना व्यावसायिक सिलिंडर उपलब्ध होईल. यापूर्वी हा सिलिंडर 1959 रुपयांना मिळत होता. त्याचबरोबर मुंबईत व्यावसायिक सिलिंडर 1844 रुपयांऐवजी 1811.5 रुपयांना मिळेल. तर चेन्नईमध्ये एलपीजी सिलिंडर 2009.50 रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी चेन्नईत 19 किलोच्या सिलिंडरची किंमत 2045 रुपये होती.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

मस्तच...! महागाईत स्वस्ताई, व्यावसायिक गॅस सिलिंडरचे भाव घटले, पण…; भाव काय?
19 किलोवाला कमर्शियल गॅस सिलिंडर 25.5 रुपयांनी स्वस्त

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm