राज्यात विधान परिषदेसाठी निवडणूक; 8 जणांनी  दाखल केला उमेदवारी अर्ज

राज्यात विधान परिषदेसाठी निवडणूक;
8 जणांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

belgavkar.com | belgaum | belgavkar

विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून जाणार्‍या 8 जागांसाठी 29 जून रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस आणि निजदमधून एकूण 7 जणांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. कर्नाटक विधानपरिषदेच्या 7 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपकडून 4, काँग्रेसमधून 2 आणि निजदमधून 1 उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. एका अपक्ष उमेदवारानेही अर्ज केला आहे. माञ, ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी याबाबतची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
पक्ष उमेदवार
भाजप माजी मंत्री एमटीबी नागरा, आर. शंकर, सुनील वल्यापुरे, प्रतापसिंग नायक
काँग्रेस बी. के. हरिप्रसादर, नजीर अहमद
निजद इंचर गोविंदराजू
अपक्ष उमेदवार एडवनहळ्ळी पी. सी. कृष्णेगौडा

विधानपरिषदेतील 12 सदस्यांचा कार्यकाळ 30 जूनला संपणार आहे. त्यापैकी 7 जागांसाठी विधानसभेतील आमदारांच्या मतदानाने निवड होणार आहे. तर 5 जागांवर राज्य सरकारकडून नामनिर्देशन होणार आहे.
या सर्व उमेदवारांनी विधानसौधमध्ये येऊन सचिवांकडे उमेदवारी अर्ज भरले. शुक्रवारी (दि. 19 जून) अर्जांची छाननी होणार आहे. 22 पर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. निवडणूक रिंगणात सातपेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असतील तर 29 जून रोजी मतदान घेण्यात येईल. त्या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत मतदान होईल. त्यानंतर लगेच निकाल जाहीर केला जाणार आहे. या सर्वांची बिनविरोध निवडीची शक्यता आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

राज्यात विधान परिषदेसाठी निवडणूक; 8 जणांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm