धर्मवीर संभाजी महाराज चौकाचे सुशोभिकरण; 21 लाखांचा आराखडा तयार;

धर्मवीर संभाजी महाराज चौकाचे सुशोभिकरण;
21 लाखांचा आराखडा तयार;

belgavkar.com | belgaum | belgavkar

महाराजांच्या जीवनावर आधारीत भीत्तीचित्रे

बेळगाव : धर्मवीर छञपती संभाजी महाराज चौकाचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. मनपाच्या अनुदानाबरोबर उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी पुढाकार घेतल्याने 21 लाखांचा आराखडा तयार झाला असून दगडी तटबंदी बांधण्यात येणार आहे. तसेच धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीच्या पाठीमागच्या बाजूला भित्तीचित्रे रेखाटण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. भविष्यातील धर्मवी संभाजी चौक कसा दिसेल, हा आराखडा स्थापत्य विशारद एम. ए. बाळेकुंद्री यांनी बनवला आहे. आतापर्यंत या चौकासाठी 12 लाख 50 हजाराचा निधी खर्च केला असून आणखी 21 लाखांचा निधी खर्च होणार आहे. 21 लाखांपैकी 12 लाख 50 हजारांचा निधी मनपाने दुसऱ्या टप्यात मंजूर झाला आहे. उर्वरीत निधी आमदार अनिल बेनके यांच्या विकासनिधीतून मिळणार आहे.

धर्मवीर संभाजी चौकाचे सुशोभिकरण करण्यासाठी माजी महापौर सरिता पाटील यांनी आपल्या कार्यकाळात प्रयत्न केले होते. दगडी तटबंदी व सुशोभिकरणावर 12 लाख 50 हजाराचा निधी खर्ची घातला आहे. दुसऱ्या टप्यात पुन्हा 12 लाख 50 हजाराचा निधी मंजुरीचा प्रस्ताव पाठवला होता. तो प्रस्ताव मंजूर होऊन नुकताच विकासाचा नारळ फुटला. विकासकामांसाठी अजून निधीची गरज आहे. तो निधी आमदार फंड व बुडाच्या निधीतून मंजूर होणार आहे. चौकाचे सुशोभिकरण लक्षवेधी ठरावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चौकात धर्मवीर संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत भीत्तीचित्रे उभारण्यात येणार आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

धर्मवीर संभाजी महाराज चौकाचे सुशोभिकरण; 21 लाखांचा आराखडा तयार;
महाराजांच्या जीवनावर आधारीत भीत्तीचित्रे

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm