बेळगाव : एपीएमसी अध्यक्षपदाची निवडणूक... APMC अध्यक्षपद कोणाला...? 5 जणांनी दाखल केला अर्ज

बेळगाव : एपीएमसी अध्यक्षपदाची निवडणूक... APMC अध्यक्षपद कोणाला...?

5 जणांनी दाखल केला अर्ज

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : एपीएमसी (APMC कृषी उत्पन्न बाजार समिती) अध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी (15 जून) होथ आहे. या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस अशी लढत असली तरी यामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अध्यक्षपदाची संधी कोणाला मिळणार, याची उत्सुकता शेतकरी व कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे.
एपीएमसी अध्यक्ष - उपाध्यक्ष निवडणुक प्रक्रियेला प्रारंभ

अध्यक्ष पदासाठी
भाजप - रेणुका पाटील
काँग्रेस - सुधीर गड्डे, युवराज कदम, संजीव मदार समिती - महेश जुवेकर
उपाध्यक्ष
काँग्रेस - महादेवी खानगौडर
यांनी अर्ज दाखल केला आहे. अर्ज माघारी दुपारी 12 वाजेपर्यंत
अध्यक्षपदी उचगावचे श्री युवराज कदम (Congress) तर उपाध्यक्षपदी हुदलीच्या महादेवी खानगौडर (Congress) यांची बिनविरोध निवड झाली आहे.
पक्ष एकूण सदस्य
भाजपा 5
काँग्रेस 5
समिती 2
अपक्ष 4

दोन्ही राष्ट्रीय पक्षांकडून अन्य सदस्यांची मते मिळवण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे.
एपीएमसीत शेतकरी, व्यापार्‍यांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी शेतकरी आपल्या विभागातून सदस्यांची निवड करतात. एपीएमसीच्या निवडणुकीवर राज्यात ज्या पक्षाचे सरकार असेल त्या सरकारकडून सरकारनियुक्त सदस्यांची नेमणूक केली जाते. तीन सदस्य सरकारनियुक्त असून यापूर्वी दोन सदस्य भाजपचे लोकनियुक्त आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या बरोबर एकीकरण समितीचे तीन सदस्य आहेत. समितीची सदस्य संख्या कमी असल्याने समितीच्या सदस्यांवरच 20 महिन्यांसाठी अध्यक्षाची निवड होणार आहे. या निवडणुकीत जर समितीने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला तर अपक्ष पक्षाचा उमेदवार अध्यक्ष होणार आहे.
प्रत्येक पक्षात दोन ते तीन जण इच्छुक असून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. एपीएमसीवर पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. यापूर्वी एपीएमसीवर मराठीची सत्ता होती. मात्र समितीच्या नेत्यांची दोन गटात विभागणी झाली. त्यामुळे संख्याबळ कमी झाले आहे. लोकप्रतिनिधींनीही या निवडणुकीत लक्ष घालण्याचे काम सुरू केले असून काँग्रेसने आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : एपीएमसी अध्यक्षपदाची निवडणूक... APMC अध्यक्षपद कोणाला...? 5 जणांनी दाखल केला अर्ज

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm