बेळगाव : राज्यसभा सदस्य म्हणून बिनविरोध निवडुन आलेले भाजपाचे नवनिर्वाचित खासदार इराण्णा कडाडी यांचे बेळगावात रवागत करण्यात आले. बेळगाव महानगर भाजपा कार्यकारिणीच्या पुढाकाराने शहरात विविध ठिकाणी स्वागत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रथम राष्र्टीय महामार्गावरील गांधीनगर येथील प्रवेशद्वारापाशी त्यांचे स्वागत महानगरचे पदाधिकारी निखील मुरकुटे, ग्रामीण अध्यक्ष धनंजय जाधव व माजी आमदार संजय पाटील यांनी केले.
त्यानंतर शहरातील कित्तूर चन्नम्मा चौक येथे येऊन त्यांनी श्री गणेशाचे दर्शन घेतले. तेथून पुढे कितूर राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात जाऊन तेथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी उद्यान येथे शिवरायांच्या मूर्तीस देखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मंञी रमेश जारकीहोळी, आमदार अनिल बेनके, आमदार अभय पाटील, माजी आमदार संजय पाटील, भाजप नेते धनंजय जाधव, किरण जाधव यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.