समर्थनगरमध्ये चिखलमय रोडचे कॉक्रीटीकरण

समर्थनगरमध्ये चिखलमय रोडचे कॉक्रीटीकरण

belgavkar.com | belgaum | belgavkar

समर्थनगर मध्ये सिमेंट कॉक्रीटीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. बेळगाव उत्तरचे आमदार श्री अनिल बेनके यांच्या प्रयत्नातुन समर्थनगर च्या आतील क्रॉस, विनायक मार्ग - 5 वा क्रॉस, 4 था क्रॉस - समोरील 4 था व 5 वा क्रॉस हे सर्व रोड सिमेंट कॉक्रीटीकरण करण्यात येत आहे. याबद्धल आमदार श्री अनिल बेनके यांचे श्री एकदंत युवक मंडळ संचलित श्री दुर्गाशक्ती महिला मंडळ तसेच समर्थनगर च्या नागरिकांच्या वतीने आभार मानन्यात आले. तसेच कॉन्ट्रॅक्टर श्री मंजुनाथ धरणावर यांचाही शाल देऊन सत्कार करण्यात आले.
समर्थनगर या वसाहतीमध्ये आजपर्यंत आश्वासने झाले होते. पण आमचे आमदार श्री अनिल बेनके यांनी आश्वासन न देता कामालाच सुरुवात केल्यामुळे समर्थनगरच्या नागरिकांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी संतोष कणेरी, नागेश गावडे, विनायक इंचल, विनायक कणेरी, विजय वर्मा, महादेव पाटील, निलेश कणेरी, सुरेश पाटील, अरुण गावडे, साई कणेरी, दयानंद हिरेमठ, गोडसे भटजी इतर नागरिक उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

समर्थनगरमध्ये चिखलमय रोडचे कॉक्रीटीकरण

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm