भाजप आमदार सुभाष सिंह यांचं निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास

भाजप आमदार सुभाष सिंह यांचं निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास

belgavkar.com | belgaum | belgavkar

सुभाष सिंह हे भाजपच्या तिकीटावर सलग चार वेळा आमदार

बिहार सरकारमधील माजी सहकार मंत्री आणि गोपालगंज मतदारसंघातून चार वेळा आमदार राहिलेले सुभाष सिंह (59) यांचं दिल्ली एम्समध्ये निधन झालं. भाजप आमदाराचं आज (मंगळवार) पहाटे 4 वाजता दिल्लीच्या एम्समध्ये निधन झालंय. सुभाष सिंह दीर्घकाळ आजारी होते आणि किडनी प्रत्यारोपणानंतर त्यांना पुन्हा एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं.
ख्वाजेपूर गावचे रहिवासी असलेले सुभाष सिंह हे भाजपच्या तिकीटावर सलग चार वेळा गोपालगंज मतदारसंघमधून आमदार होते. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, किडनी प्रत्यारोपणानंतर त्यांना गोपालगंज येथील घरी आणण्यात आलं. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना पुन्हा दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आलं. सुभाष सिंह यांचा राजकीय प्रवास 1990 च्या दशकात सुरू झाला. त्यानंतर ते गोपालगंजच्या युनियनचे अध्यक्ष होते. यानंतर त्यांनी सहकार क्षेत्रात काम केलं.




एनडीए सरकारमध्ये सहकारमंत्री : सुभाष सिंह यांची लोकप्रियता पाहून भाजपनं गोपाळगंज मतदारसंघमधून विधानसभेचं आमदारकीचं तिकीट दिलं. 2005, 2010, 2015 आणि 2020 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Assembly Election) ते सतत आमदार म्हणून निवडून आले. सलग चार वेळा आमदार राहिल्यानंतर एनडीए सरकारमध्ये त्यांना सहकारमंत्री करण्यात आलं.
सहकार मंत्री झाल्यापासून ते सतत आजारी होते आणि त्यांच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू होते. गोपालगंज भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद सिंह यांनी सांगितलं की, भाजप आमदाराचं आज पहाटे 4 वाजता दिल्लीच्या एम्समध्ये निधन झालं. विशेष विमानानं त्यांचं पार्थिव पाटणा इथं आणण्यात येणार आहे. यानंतर गोपाळगंजमधील ख्वाजेपूर या वडिलोपार्जित गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

भाजप आमदार सुभाष सिंह यांचं निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
सुभाष सिंह हे भाजपच्या तिकीटावर सलग चार वेळा आमदार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm