मोठी दुर्घटना; 39 जवानांसह नदीपात्रात कोसळली बस, 6 जणांचा मृत्यू

मोठी दुर्घटना;
39 जवानांसह नदीपात्रात कोसळली बस, 6 जणांचा मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

जवानांची एक बस दरीमध्ये कोसळली

जम्मू काश्मीरमधून मोठी बातमी समोर आली आहे. काश्मीरच्या पहलगाम येथील चंदनवाडी परिसरात जवानांची एक बस दरीमध्ये कोसळली. माहितीनुसार, या बसमध्ये 39 जवान होते. दुर्घटनेत अनेक जवानांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ITBP ने दिलेल्या माहितीनुसार, 39 कर्मचारी (ITBP मधील 37 आणि JKP मधील 2) घेऊन जाणारी सिव्हिल बस रस्त्याच्या कडेला असलेल्या नदीच्या पात्रात कोसळली. बसचे ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. हे जवान चंदनवारीहून पहलगामकडे निघाले होते. प्रकरणात घातपाताची भीती व्यक्त केली जात आहे.
आयटीबीपीच्या वाहनाच्या अपघातात सहा जवानांच्या मृत्यूची पुष्टी झाल्याचे बचाव पथकाच्या पथकांनी सांगितले आहे. मृत जवानांची संख्या 10 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. बस दरीत कोसळून अपघात झाला आहे. या दुर्घटनेत अनेक जवान शहीद झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचाव आणि मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त लवकरच...

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

मोठी दुर्घटना; 39 जवानांसह नदीपात्रात कोसळली बस, 6 जणांचा मृत्यू
जवानांची एक बस दरीमध्ये कोसळली

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm