belgaum-belgavkar-12-trap-cameras-and-7-cages-5th-day-of-search-to-capture-the-leopard-belgaum-202208.jpg | बेळगाव : 'तो' बिबट्या नेमका गेला कुठे? ट्रॅप कॅमेरे आणि वेगवेगळे अंदाज | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : 'तो' बिबट्या नेमका गेला कुठे? ट्रॅप कॅमेरे आणि वेगवेगळे अंदाज

belgavkar.com | belgaum | belgavkar

पुन्हा जंगलात गेला की नाही? याचा शोध या ट्रॅप कॅमेऱ्याच्या माध्यमातून

बिबट्याने गोल्फ कोर्स मैदान ओलांडले?

बेळगाव : जाधवनगर आणि गोल्फ कोर्स मैदान परिसरात बिबट्याचा वावर आढळून 12 दिवस झाले. बिबट्याच्या वावराने जाधवनगर, हनुमाननगर, रेसकोर्स परिसरातील नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी शोधमोहीम हाती घेतली आहे. बिबट्या याच परिसरात आहे की तो भिंत ओलांडून गेला आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. तरीही बिबट्या नजरेस पडला नाही. भूकेल्या बिबट्याने भिंतीवरून उडी टाकल्याचा संशय बळावला आहे.
बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसून आले होते. त्यानंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण होते. संपूर्ण परिसर बिबट्याच्या दहशतीखाली होते. हा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे. त्यानंतर तो पुन्हा जंगलात गेला की नाही? सध्या बिबट्या कुठे आहे? त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आता वनविभागाकडून आजूबाजूच्या परिसरात 16 अधिक ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हा बिबट्या पुन्हा जंगलात परतला असावा, असा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात येत आहे.
हा बिबट्या कुठे आहे? मानवी वस्तीत कुठे लपून बसला आहे का? पुन्हा जंगलात गेला की नाही? याचा शोध या ट्रॅप कॅमेऱ्याच्या माध्यमातून वनविभाग घेत आहेत. रात्रीच्या वेळी वनविभागाच्या गाड्या गस्त घालत आहेत. ज्या ठिकाणांवरून लोकांचे फोन येत आहेत, त्या ठिकाणी जाऊन वनविभागाचे कर्मचारी गस्त घालून शोध घेत आहेत. बिबट्या मानवी वस्तीत आल्यानंतर याचा त्रास कोणाला होऊ नये, म्हणून अधिक सतर्कता बाळगली पाहिजे.