singer-rahul-jain-was-accused-of-rape-by-a-costume-stylist-fir-registered-202208.jpeg | सिंगर राहुल जैनवर बलात्काराचा आरोप; | belgaum news | belgavkar बेळगावकर

सिंगर राहुल जैनवर बलात्काराचा आरोप;

belgavkar.com | belgaum | belgavkar

30 वर्षीय महिला 'कॉस्च्युम स्टायलिस्ट'वर बलात्कार केल्याप्रकरणी एफआयआर दाखल

मुंबई : बॉलीवूड गायक-संगीतकार राहुल जैन याच्याविरुद्ध 30 वर्षीय महिला 'कॉस्च्युम स्टायलिस्ट'वर बलात्कार केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एका अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. गायकाने हे आरोप फेटाळून लावले असून हे सगळे आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. याआधीही गायक राहुल जैन याच्यावर बलात्कार आणि जबरदस्ती गर्भपात आणि फसवणूक अशा अनेक आरोपांवर एफआयआर दाखल करण्यात आला होता.
कॉस्ट्यूम स्टाइलिस्टने लावला आरोप 
ही घटना 11 ऑगस्ट 2022 ची आहे. एफआयआरचा संदर्भ देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, तक्रारदाराने ओशिवरा पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या आपल्या जबानीत जैन यांनी इन्स्टाग्रामवर त्याच्याशी संपर्क साधला होता आणि त्याच्या कामाची प्रशंसा केली होती. सिंगरने कॉस्च्युम स्टायलिस्टला मुंबईतील अंधेरी येथील फ्लॅटवर बोलावलं. सामान दाखवण्याच्या बहाण्याने आरोपीने तिला आपल्या बेडरूममध्ये नेलं आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने या सगळ्याला विरोध केला असता जैनने तिला मारहाण करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्याने सांगितलं की, पोलिसांनी राहुल जैनविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 376, 323 आणि 506 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. गायकाला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या घटनेबाबत राहुल जैन यांच्याशी संपर्क साधला असता त्याने सांगितलं की, मी या महिलेला ओळखत नाही. तिने केलेले सगळे आरोप खोटे आहेत. यापूर्वीही एका महिलेने माझ्यावर असेच आरोप केले होते. पण मला न्याय मिळाला. ही स्त्री तिचीच सहकारी असू शकते.