trs-leader-tammineni-krishnaiah-murdered-minutes-after-hoisting-tricolor-khammam-district-202208.jpeg | तिरंगा फडकवल्यानंतर काही मिनिटांतच TRS नेत्याची हत्या | belgaum news | belgavkar बेळगावकर

तिरंगा फडकवल्यानंतर काही मिनिटांतच TRS नेत्याची हत्या

belgavkar.com | belgaum | belgavkar

तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातील एका गावात राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर काही वेळातच सोमवारी TRS नेते तम्मिनेनी कृष्णैय्या यांची चार अज्ञात व्यक्तींनी हत्या केली. या घटनेनंतर परिसरात वाढता तणाव पाहून पोलिसांनी कलम 144 लागू केलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणा राष्ट्रीय समितीचे (Telangana National Committee) नेते तम्मिनेनी कृष्णैया यांच्यावर खम्मम ग्रामीण मंडळाच्या तेलदारुपल्ली गावात चार अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून त्यांची हत्या केली. सोमवारी सकाळी राष्ट्रीय ध्वजारोहण समारंभातून टीआरएस नेते परतत असताना ही घटना घडली.
खम्मम जिल्ह्याच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, तम्मिनेनी कृष्णैया हे राष्ट्रध्वज फडकावून दुचाकीवरून परतत होते. तेलदारुपल्ली गावच्या वेशीवर एका ऑटोरिक्षातील चार जणांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना रक्ताच्या थारोळ्यात टाकून पळ काढला. खम्मम एसीपी म्हणाले, तेलदारुपल्ली गावच्या प्रवेशद्वाराजवळ एक ऑटो आली आणि त्यातील लोकांनी टीआरएस नेत्याला जागीच ठार केलं आणि तेथून पळ काढला. या घटनेत सहभागी असलेल्या चार आरोपींचा शोध घेण्यासाठी आम्ही 4 पथकं तयार केली आहेत. तम्मिनेनी कृष्णैय्या यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. खम्मम ग्रामीण पोलिसांनी उपलब्ध पुराव्याच्या आधारे एफआयआर नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केलाय.