अंबानी कुटुंबीय धमकी प्रकरणी एका संशयिताला घेतले ताब्यात

अंबानी कुटुंबीय धमकी प्रकरणी एका संशयिताला घेतले ताब्यात

belgavkar.com | belgaum | belgavkar

या माथेफिरूने 7 ते 8 वेळा फोन केल्याची माहिती

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना जीव मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. पण फोन करणारी व्यक्ती ही मानसिक रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी एका संशयित व्यक्तीला बोरिवलीतून ताब्यात घेतले आहे. अंबानी कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा फोन कॉल आल्यामुळे खळबळ उडाली आहे. रिलायन्स फाऊंडेशन हॅास्पिटलमध्ये एका अज्ञात माथेफिरून फोन करून धमकी दिली आहे. या माथेफिरूने 7 ते 8 वेळा फोन केल्याची माहिती समोर आली आहे. 
दरम्यान या धमकीनंतर रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलकडून डी. बी. मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी तातडीने सूत्र फिरवली आणि बोरिवलीतील MHB कॉलनीमधून एका जणाला ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्स फाऊंडेशन हॅास्पिटलमध्ये हे फोन करण्यात आले होते. एकूण 8 फोन करण्यात आले होते. या अज्ञात व्यक्तीने मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयाला जीवे मारण्याची धमकी दिली.  या व्यक्तीने एकापाठोपाठ असे 8 फोन कॉल केले होते, या प्रकारानंतर आम्ही डीबी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती, रिलायन्स फाऊंडेशन हॅास्पिटलच्या डॉ. तरंग ज्ञानचंदानी यांनी दिली. फोनवर धमकी देणाऱ्या व्यक्तीने आपलं नाव अफजल असल्याचे सांगितले.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी देणे, जीवे मारण्याची धमकी देणे, अर्वाच्च भाषा वापरणे याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समोरील व्यक्ती हा वारंवार एकच बोलत होता, मी अंबानी कुटुंबीयांना मारणार आहे, त्यांना मरावेच लागणार आहे, असं तो फोनवर बोलत होता. पोलिसांनी हे फोन कॉल रेकॉर्ड ऐकले आहे. त्यावरून हा व्यक्ती मानसिक रुग्ण किंवा कुठल्या तरी तणावाखाली असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही व्यक्ती मानसिक तणावाखाली असावी, त्यातून त्याने राग व्यक्त करण्यासाठी एकापाठोपाठ फोन केले असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, अंबानी कुटुंबीयांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. अंबानी यांच्या सुरक्षारक्षकांचे हेड आहे त्यांच्याशी मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपर्क केला आहे. संपूर्ण प्रकरणाची कल्पना दिली आहे. जर सुरक्षा वाढवण्याची गरज असेल तर तातडीने पाऊलं उचलली जाणार आहे. अंबानी यांच्या अँटलिया या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

अंबानी कुटुंबीय धमकी प्रकरणी एका संशयिताला घेतले ताब्यात
या माथेफिरूने 7 ते 8 वेळा फोन केल्याची माहिती

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm