बेळगाव : येळ्ळूर-वडगाव मार्गावर अपघात, युवकाचा मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : येळ्ळूर-वडगाव रस्त्यावरील बळळारी नाल्याजवळ असलेल्या राईस मिल समोर दुचाकीचा अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. चंद्रकांत पारीस कांबळे (वय 24 रा. येळळूर) असे या अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. तो येळळूरकडून वडगावच्या येळळूर केएलई इस्पितळाकडे येत होता. त्यावेळी हा अपघात झाला आहे.
आज सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अँक्टिव्हा वरून जाणाऱ्या युवकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. गाडी घसरून रस्त्याच्या शेजारी पडलेल्या इसमाने हेल्मेट न घातल्याने त्याच्या डोक्याला जबर माल बसला. हा अपघात इतका भीषण होता की यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलीस पुढील तपास करण्यात येत आहे.