big-news-death-threat-to-ambani-family-202208.jpeg | अंबानी कुटुंबाला तीन तासांत संपवण्याची धमकी | belgaum news | belgavkar बेळगावकर

अंबानी कुटुंबाला तीन तासांत संपवण्याची धमकी

belgavkar.com | belgaum | belgavkar

रिलायन्स फाऊंडेशनच्या फोनवर धमकी आल्याची माहिती

देशातील सर्वात मोठी लिस्टेड कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंबानी कुटुंबाला चार-पाच तासांत संपवण्याची धमकी देण्यात आली आहे. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या फोनवर ही धमकी आल्याची माहिती आहे. या धमकीनंतर पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर आल्या आहेत. पोलिसांनी या धमकी प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
दरम्यान, आज संपूर्ण देश 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यापासून ते दुर्गम गावांपर्यंत लोक तिरंगा फडकावून स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करत आहेत. मुकेश अंबानी यांनीही कुटुंबासोबत स्वातंत्र्य दिन साजरा केला. यावेळी मुकेश अंबानी यांचा नातू पृथ्वी अंबानी यांच्या हातातही तिरंगा दिसला.