बेळगाव : पाकिटमारीप्रकरणी दोघांना अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : मध्यवर्ती बसस्थानक परिसरात पाकिटमारीप्रकरणी मार्केट पोलिसांनी दोघांना अटक केली. पंतनगर-पंतबाळेकुंद्री येथील महिलेच्या पर्समधील रोकड लांबविण्यात आली होती. त्याचा छडा पोलिसांनी लावला असून सूरज उदय बागडे (वय 30) व अविनाश नागेश बेस्तर (27, दोघेही रा. गंगाधरनगर, हुबळी) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, मध्यवर्ती बसस्थानकावर महिलेच्या बॅगमधील रोकड लांबविल्याची घटना घडली होती. यामुळे मार्केट पोलिस स्थानकात याविरोधात गुन्हा दाखल झाला होता.
पोलिस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी, उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावरसह सहकाऱ्यांनी चौकशी केली. यामागे पाच जण असल्याचे पुढे आले असून त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. फिर्यादी राजेश्वरी दुंडय्या कट्टीमठ (रा. पंतनगर-पंतबाळेकुंद्री) बेळगावला आल्या होत्या. बेळगावहून सुळेभावीला बसमधून जाताना गर्दीचा फायदा घेऊन राजेश्वरी यांच्या व्हॅनेटी बॅगमधील 34000 रोकड, एटीएम कार्ड, चेकबुक लांबविले होते. बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास प्रकार घडला होता. याप्रकरणी टोळीतील दोघांना अटक केली असून तिघे फरार आहेत. संशयितांकडून 1,300 रोकड जप्त केली आहे. संशयित सूरज व अविनाश यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असताना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्दितीय न्यायाधीशांनी न्यायालय कोठडीत रवानगी केली. या प्रकरणाचा पुढील तपास मार्केट पोलिसांकडून सुरू आहे.