viral-video-look-at-thisthe-bird-seems-to-be-speaking-english-video-goes-viral-202208.jpeg | Viral Video : अय्यो...! ह्यो बघा इंग्रजीत बोलायलाय…व्हिडीओ बघून अनेकांना आश्चर्याचा धक्का | belgaum news | belgavkar बेळगावकर

Viral Video : अय्यो...! ह्यो बघा इंग्रजीत बोलायलाय…व्हिडीओ बघून अनेकांना आश्चर्याचा धक्का

belgavkar.com | belgaum | belgavkar

स्टारलिंग - Starling

विविध प्रकारचे प्राणी आणि पक्ष्यांशी संबंधित व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात, त्यातील काही खूप मजेशीर असतात तर काही लोकांना सरप्राईजही देतात. त्याचबरोबर काही व्हिडिओ लोकांच्या डोळ्यात अश्रूही आणतात आणि काही थोडे विचित्रही असतात, जे पाहिल्यानंतर डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण होऊन बसते. असाच एक व्हिडिओ आजकाल सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, कारण या व्हिडीओमध्ये एक पक्षी भन्नाट इंग्रजी बोलताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि पक्ष्याचे बोलणे ऐकल्यानंतर, आपण आपल्या डोळ्यांवर आणि कानांवर खरोखर विश्वास ठेवणार नाही.

तसे पाहिले तर पोपटांबद्दल सर्वसाधारणपणे असे म्हटले जाते की, ते कॉपी करण्यात निपुण असतात. माणसांचा आवाज ते उत्तम काढतातच, पण वेगवेगळ्या वाद्यांच्या आवाजाचीही ते आरामात नक्कल करतात, पण इथे आणखी एक पक्षी त्यांची आणखी चांगली नक्कल करताना दिसतो. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला त्या पक्ष्याला इंग्रजीत काही तरी बोलते आणि तो त्याची भन्नाट नक्कलही करतो. पक्षी इतका हुबेहूब इंग्रजी बोलतो की ऐकून तुम्ही थक्क व्हाल. इतकंच नाही तर इतरही काही आवाज काढताना तो दिसतो, जणू काही अनेक वाद्यं एकाच वेळी वाजत आहेत. मग तो शिट्टीचा आवाजही दाखवतो. या पक्ष्याच्या अनोख्या प्रतिभेने कित्येकांची मने जिंकली आहेत.
या पक्ष्याचे नाव युरोपियन स्टारलिंग असे सांगितले जात आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर सायन्स गर्ल नावाच्या आयडीसह हा नेत्रदीपक व्हिडिओ शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘हे स्टारलिंग ऐका. युरोपियन स्टारलिंग एक कुशल मिमिक्री कलाकार आहे.”