बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांचा आकडा 200 पार होणार काय...? 'या' गावांमध्ये 50 ते 60 कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्याची शक्यता...?

बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांचा आकडा 200 पार होणार काय...?

'या' गावांमध्ये 50 ते 60 कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्याची शक्यता...?

belgavkar.com | belgaum | belgavkar

ऑरेंज झोन बेळगाव जिल्ह्यात 2 जुन च्या राज्य सरकारच्या आरोग्य बुलेटिनमध्ये 50 ते 60 जणांना कोरोनाची (CoVID-19) लागण झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या 200 पार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यात 153 कोरोनाबाधीत आढळले आहेत तर एका कोरोना बाधीत महिलेचा मृत्यू तर 119 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण कोरोनामुक्त (डिस्चार्ज) झालेले आहेत. एकुण 41 कोरोना पाॅझिटिव्ह अ‍ॅक्टीव्ह / सक्रीय रुग्णांवर आयसोलेशन वार्डमध्ये उपचार सुरु आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील 'या' भागांमध्ये आढळल्याची शक्यता...? कोरोना पॉझिटिव्ह Coronavirus

एरिया कोरोना पाॅझिटिव्ह
अतिवाड गाव - बेळगाव ग्रामीण 11
उचगाव गाव - बेळगाव ग्रामीण 3
मुतगा (सांबरा) गाव - बेळगाव ग्रामीण 2
सुळगा गाव - बेळगाव ग्रामीण 2
बाळेकुंद्री खुर्द - बेळगाव ग्रामीण 1
बाळेकुंद्री बुद्रुक - बेळगाव ग्रामीण 1
सावगांव - बेळगाव ग्रामीण 1
सांबरा गाव - बेळगाव ग्रामीण 1
कल्लोळ गांव - गोकाक 1
शील्लीभावी गाव - गोकाक 1
दड्डी - हुक्केरी यमकनमर्डी 12
कोट - हुक्केरी यमकनमर्डी 3
मोदगा - हुक्केरी यमकनमर्डी 2
मनगुट्टी - हुक्केरी यमकनमर्डी 2
दूड्डगट्टी - हुक्केरी यमकनमर्डी 2
बिद्रेवाडी - हुक्केरी यमकनमर्डी 1
हुक्केरी व इतर तालुका बाकीचे
'या' गावामध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खबरदारी...?
बेळगाव शहरापासुन जवळ असलेल्या उचगांव, अतिवाड, सांबरा-मुतगा, सुळगा, बाळेकुंद्री खुर्द गावामध्ये क्वारंटाईन असलेल्यांना कोरोना व्हायरस झाल्याची शक्यता आहे. संशयितांना आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी आज सकाळपासुनच त्यांना ताब्यात घेऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्याची तयारी सुरु केली आहे. संबधित रूग्ण परराज्यातून आले असल्याने घाबरण्याचे कारण नसले तरी ग्रामस्थ काळजी घेत आहेत. गावात संपर्कात आलेल्यांची माहिती गोळा केली जात आहे. आरोग्य खात्याने कुंटुंबातील संपर्क आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन केले आहे. गाव कंटेनमेंट झोन म्हणून घोषित नसले तरी गावकर्यांनी खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. तसेच नागरिकांनी अफवा किंवा चुकीच्या बातमीवर विश्वास ठेवू नये असे ग्रामपंचायत कार्यालयातर्फे सांगण्यात आले आहे. पुणे व मुंबईहून परतलेल्या कामगारांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते.
ऑरेंज झोन बेळगाव जिल्ह्यात 2 जुन रोजी राज्य सरकारच्या आरोग्य बुलेटिनमध्ये 51 जणांना कोरोनाची (CoVID-19) लागण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या 204 झाली आहे. जिल्ह्यात एका कोरोना बाधीत महिलेचा मृत्यू तर 126 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण कोरोनामुक्त (डिस्चार्ज) झालेले आहेत. एकुण 85 कोरोना पाॅझिटिव्ह अ‍ॅक्टीव्ह / सक्रीय रुग्णांवर आयसोलेशन वार्डमध्ये उपचार सुरु आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील 'या' भागांमध्ये आढळले कोरोना पॉझिटिव्ह Coronavirus

एरिया कोरोना पाॅझिटिव्ह
अतिवाड गाव - बेळगाव ग्रामीण 11
उचगाव गाव - बेळगाव ग्रामीण 3
मुतगा (सांबरा) गाव - बेळगाव ग्रामीण 2
सुळगा गाव - बेळगाव ग्रामीण 2
बाळेकुंद्री खुर्द - बेळगाव ग्रामीण 1
बाळेकुंद्री बुद्रुक - बेळगाव ग्रामीण 1
सावगांव - बेळगाव ग्रामीण 1
सांबरा गाव - बेळगाव ग्रामीण 1
कल्लोळ गांव - गोकाक 1
शील्लीभावी गाव - गोकाक 1
दड्डी - हुक्केरी यमकनमर्डी 12
कोट - हुक्केरी यमकनमर्डी 3
मोदगा - हुक्केरी यमकनमर्डी 2
मनगुट्टी - हुक्केरी यमकनमर्डी 2
दूड्डगट्टी - हुक्केरी यमकनमर्डी 2
बिद्रेवाडी - हुक्केरी यमकनमर्डी 1
हुक्केरी व इतर तालुका बाकीचे

बेळगाव शहरा जवळच्या गावांमध्ये क्वारंटाइन असलेल्या 22 जणांना व गोकाक, हुक्केरी, यमकनमर्डी येथील संशयितांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई व पुणे तसेच हिरेबागेवाडीवरुन बेळगावला आलेल्यांना व आंतर राज्य प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची दाट शक्यता गावांमध्ये वर्तविली जात आहे. बातमी आसपासच्या गावांमध्ये पसरली आहे. आज सायंकाळच्या आरोग्य विभागाच्या बुलेटिनमध्ये याबाबत अधिकृत माहिती मिळताच याची पुष्टी होईल. माञ ही शक्यता सत्यता बदलणार की एक पसरलेली कोरोनाची अफवा हे आरोग्य विभागाच्या मेडिकल बुलेटिनमध्ये होणार आहे. तसेच पुढील तीन दिवस गावात कडकडीत लाॅकडाऊन असणार असल्याचे पुकारण्यात येत आहे.
600 जणांची सुटका स्वॅब तपासणी रिपोर्ट अहवाल येण्याआधी
कोरोना स्वॅब तपासणी रिपोर्ट येण्याआधी क्वारंटाईनमधील 600 जणांची सुटका करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी यासंबंधी आरोप केला असून एका यमकनमर्डी मतदारसंघातच 400 हून अधिक चाकरमान्यांची क्वारंटाईनची मुदत संपण्याआधीच सुटका करण्यात आली आहे. यापुढे तरी सरकारने खबरदारी घ्यावी. अशा गलथानपणामुळे कोरोनाचा धोका वाढतो आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांचा आकडा 200 पार होणार काय...? 'या' गावांमध्ये 50 ते 60 कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्याची शक्यता...?

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm