पत्रकार मोहम्मद जुबेर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

पत्रकार मोहम्मद जुबेर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

belgavkar.com | belgaum | belgavkar

Alt News चे सहसंस्थापक मोहम्मद जुबेर यांना धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अटक

Alt News चे सहसंस्थापक मोहम्मद जुबेर यांना दिल्ली पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी त्याला आयपीसी कलम 153/295 अंतर्गत अटक केली आहे. मोहम्मद जुबेर यांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या IFSC युनिटने अटक केली आहे. जुबेर यांच्याविरुद्ध आयपीसी कलम 153/295 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्याच प्रकरणाच्या तपासामुळे आज जुबेर यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. जुबेर यांना पुरेशा पुराव्याच्या आधारे अटक करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मागितली जाणार आहे.
दिल्ली पोलिसांच्या वतीने असे सांगण्यात आले की, मोहम्मद जुबेर यांनी एका विशिष्ट धार्मिक समुदायाविरुद्ध पोस्ट केलेले फोटो आणि शब्द हे अत्यंत प्रक्षोभक असून लोकांमध्ये द्वेष पसरवण्यासाठी हेतुपुरस्सर आहेत. यामुळे सार्वजनिक शांतता राखणे कठीण होऊ शकते. या पोस्टच्या आधारे वरील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बोलताना Alt News सह-संस्थापक प्रतीक सिन्हा यांनी सांगितले की, मोहम्मद जुबेर यांना 2020 मध्ये एका वेगळ्या प्रकरणात चौकशीसाठी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने बोलावले होते. या प्रकरणात त्यांना उच्च न्यायालयाचे संरक्षण मिळाले आहे. तथापि, आज संध्याकाळी 6:45 वाजता आम्हाला कळवण्यात आले की, त्यांना आता अन्य एका प्रकरणात एफआयआर दाखल झाल्यामुळे अटक करण्यात आली आहे.
ते म्हणाले की, मोहम्मद जुबेर यांना या प्रकरणी कोणतीही सूचना देण्यात आली नाही. ज्या कलमांमध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे, त्या कलमांमध्ये नोटीस देण्याची तरतूद आहे. मात्र तसे करण्यात आलेले नाही. अनेक वेळा विनंती करूनही आम्हाला एफआयआरची प्रत देण्यात आली नाही.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

पत्रकार मोहम्मद जुबेर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप
Alt News चे सहसंस्थापक मोहम्मद जुबेर यांना धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अटक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm