बेळगाव : महापौर-उपमहापौर निवडणूक घेण्याची मागणी

बेळगाव : महापौर-उपमहापौर निवडणूक घेण्याची मागणी

belgavkar.com | belgaum | belgavkar

भाजपाने 35 जागांवर विजय मिळवला आहे

3 सप्टेंबर रोजी मतदान झाले, तर 6 सप्टेंबर रोजी निकाल जाहीर झाला.

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच पक्षीय पातळीवर लढवल्या गेलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपाने स्पष्ट बहुमतासह निर्विवाद यश मिळवलं आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या एकूण 58 जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपाने 35 जागांवर विजय मिळवला आहे. बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक होऊन 8 महिने उलटून गेले तरी अद्याप महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक घेण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रभागांमधील कोणतीही कामे होत नाही आहेत. त्यामुळे बेळगाव महापौर-उपमहापौर निवडणूक तात्काळ घेण्यात यावी अशी मागणी 15+ नगरसेवकांनी केली आहे.
अद्यापही महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक झालेली नाही. त्यामुळे नगरसेवक होऊन देखील कोणत्याही प्रकारे कायदेशीर अधिकार प्राप्त न झाल्यामुळे निवडून आलेल्या काँग्रेस, एमआयएम आणि अपक्ष नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्‍वभूमीवर आज सोमवारी सकाळी प्रादेशिक आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन नगरसेवकांनी तात्काळ महापौर-उपमहापौर निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी करत त्या आशयाचे निवेदन सादर केले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : महापौर-उपमहापौर निवडणूक घेण्याची मागणी
भाजपाने 35 जागांवर विजय मिळवला आहे

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm