विकत घेतला देशातील सर्वात महागडा बकरा, काय आहे किंमत?

विकत घेतला देशातील सर्वात महागडा बकरा, काय आहे किंमत?

belgavkar.com | belgaum | belgavkar

तब्बल 7 लाख रुपयांमध्ये विकला गेला कोटा जातीचा बकरा

येत्या काळात बकरी ईद (Bakri Eid) आहे. या काळात मोठ्या प्रमाणात बकरे आणि बकऱ्या विकल्या जातात. त्यात एखादा बकरा (Goat) लाखो रुपयांमध्ये विकल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? तर मध्यप्रदेश राज्यातील भोपाळमध्ये देशातील सर्वात महागडा बकरा विकला गेला आहे. हा बकरा कोटा जातीचा आहे. तसेच याचे नाव टायटन असे आहे. बकरी ईदवर कुर्बानीसाठी भोपाळमध्ये तब्बल 7 लाख रुपयांमध्ये विकला गेला आहे. या बकऱ्याची देखभाल करणाऱ्या सैयद शाहेब अली यांनी दावा केला आहे की, तूप, लोणी आणि औषधी वनस्पती खाऊन तयार होणारा हा देशातील सर्वात महागडा बकरा आहे.
याव्यतिरिक्त भोपाळमध्ये गुंडा बकरा अडीच लाख रुपये आणि तैमूर नावाचा बकरा 2 लाख रुपयांमध्ये विकला गेला आहे. या दोघांनाही शाहेब अली यांनीच तयार केले आहे. यांना पुण्यातील माज खान यांनी खरेदी केले आहे. हैदराबादपासून काश्मीरपर्यंत त्यांनी चांगल्या जातीच्या महागडे बकरे पाहिले होते. मात्र, भोपाळमध्ये आल्यानंतर त्यांचा शोध संपला. सैयद शाहेब अली म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी ते कोटा येथून 15 बकरे घेऊन आले होते. त्यांच्या आहारात हरभरा व्यतिरिक्त बाजरी, दूध, तूप, लोणी आणि औषधी वनस्पती यांचा समावेश केला होता. त्यामुळे टायटन, भोपाळचा गुंडा आणि तैमूर या तिघांमध्ये भारतीय प्रजाती समोर आली. मोठे झाल्यावर त्यांना मजबूत शरीर, लांब कान, अप्रतिम उंची आणि त्याचे वजनही वाढले.
@ पुण्याचे रहिवासी मज खान यांनी सांगितले की, त्यांचे स्वतःचे बकरी फार्म आहे. यावर्षी ते काश्मीर, हैदराबाद आणि सुरत येथे आले होते. मात्र, त्यांना भारतीय जातीचे बकरे आढळले नाहीत. भोपाळ येथे आल्यावर त्यांना कोटा जातीचे तीन बकरे मिळाले बकरी ईदला सर्वोत्तम बकरा अल्लाहला कुर्बान केला जातो. यासाठी वर्षभर आणि आम्ही त्या स्वरुपाचा बकरा शोधत असतो. यासाठी 8 ते 10 लाख रुपये खर्च केले जातात. कोरोनानंतर भारतीय जातीचे बकरे तयार होत नाहीत, त्यामुळे भाव वाढले आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

विकत घेतला देशातील सर्वात महागडा बकरा, काय आहे किंमत?
तब्बल 7 लाख रुपयांमध्ये विकला गेला कोटा जातीचा बकरा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm