बेळगाव : दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिरात आज विशेष आकर्षक आरास करण्यात आली होती. संपूर्ण गाभारा फुलांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिकृतीमध्ये सजवण्यात आला होता.
यावेळी पौरोहित्य नागराज कट्टी यांनी केले. विशेष परिश्रम मंदिराचे सेवेकरी सचिन आनंदाचे, गणेश देवर, राजू पाटील यांनी केले. या वेळी मंदिराचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, राजू भातकांडे, राहुल कुरणे, विवेक पाटील, अभिजित चव्हाण, दौलत जाधव, ज्योतिबा महेशी, संजय मणगूतकर आदी ट्रस्टी सेवेकरी सेवेकरी उपस्थित होते.