slice.png | Google Alerts : हे APP करतायत तुम्हा फोनची हेरगिरी, आजच डिलीट करा | belgaum news | belgavkar बेळगावकर

Google Alerts : हे APP करतायत तुम्हा फोनची हेरगिरी, आजच डिलीट करा

belgavkar.com | belgaum | belgavkar

तुमच्या फोनमध्ये आहे का हे APP आजच डिलीट करा, गुगलकडून अलर्ट जारी

slice app

कोरोना काळात स्मार्टफोनचा वापर झपाट्याने वाढला आहे. एवढंच नाही तर आता कॅशलेस होण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. या सगळ्यात गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणात सायबर क्राइम आणि हॅकिंगचं प्रमाण वाढलं आहे. लोक वेगवेगळे थर्ड पार्टी अ‍ॅप वापरत असल्याने सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. तुमच्या फोनमध्ये जर तुम्ही थर्ड पार्टी अ‍ॅपमधील हे अ‍ॅप डाऊनलोड केलं असेल तर आजच डिलीट करून टाका. याचं कारण या App चा वापर तुमच्या फोनमधील डेटा हॅक करण्यासाठी केला जातो. हॅकर्स या अ‍ॅपचा वापर तुमची माहिती आणि पैसे उकळण्यासाठी करत आहेत. 
गुगल प्लेने एक नोटिफिकेशन जारी केलं आहे. यूजर स्लाइस अ‍ॅप असं त्याचं नाव आहे. तुमच्याकडे जर हे अ‍ॅप असेल तर डिलीज करा. हे अ‍ॅप तुमच्या व्यक्तीगत डेटावर नजर ठेवून आहे. तुमचे फोटो, व्हिडीओ, कॉल हिस्ट्री, मेसेज या सगळ्याची हे अ‍ॅप हेरगिरी करत. तुमच्या फोनमध्ये हे अ‍ॅप असेल तर डिलीट करा. तुम्हाला जर या अ‍ॅपचं नोटिफिकेशन किंवा लिंक डाऊनलोड करण्यासाठी आली तर चुकूनही यावर क्लीक करू नका. या अ‍ॅपने आपल्या ट्वीटरवर स्पष्टीकरणही दिलं आहे. अ‍ॅन्ड्रॉइड अपडेटमुळे एक मेसेज सगळ्यांना जात होता. त्यावर काम केलं असून ही समस्या सोडवण्यात आली आहे. 1 टक्के युजर जुने व्हर्जन वापरत आहे. तुमच्याकडे जर जुन्या APP चं व्हर्जन असेल तर तुम्ही लवकर ते डिलीट करा आणि पुन्हा नव्याने डाऊनलोड करा. 
तुमचा डेटा आणि गोपनीय आणि सुरक्षित ठेवण्याचं या APP कडून ग्राहकांना वचन देण्यात आलं. आमच्या अ‍ॅपमध्ये कोणताही बदल झालेला नाही. तांत्रिक कारणामुळे या अ‍ॅपमध्ये गडबड झाली होती. यासंदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. युजर्सच्या गैरसोयीबद्दल त्याने दिलगिरी व्यक्त केली आहे.