दक्षिण आफ्रिकेतील पूर्व लंडन शहराच्या टाऊनशिपमधील नाईट क्लबमध्ये रविवारी 20 तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. परीक्षा संपली म्हणून पार्टी करण्यासाठी हे तरुण या क्लबमध्ये आले होते. मात्र, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. या सगळ्या मृत तरुणांचे वय 18 ते 20 असल्याचे सांगण्यात येत आहे. डिस्पॅचलाइव्ह या प्रादेशिक स्थानिक वृत्तपत्राने अहवालानुसार क्लबमध्ये टेबल, खुर्च्यांसह मृतदेह जमिनीवर विखुरलेल्या अवस्थेत होते. सुरुवातीला यांच्यामध्ये झटापट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, मृतदेहांवर कोणत्याही प्रकारच्या जखमांचे चिन्ह नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
परीक्षा संपली म्हणून पार्टी करण्यासाठी आले होतेसोशल मीडियावर शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये क्लबच्या मजल्यावर विखुरलेल्या मृतदेहांवर जखमांची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. हायस्कूलची परीक्षा संपल्यानंतर हे सर्व तरुण पार्टी करण्यासाठी या कल्बमध्ये आले होते. तरुणांच्या मृताची बातमी कळताच त्यांच्या नातेवाईकांनी क्लबबाहेर रडारड करत एकच गोंधळ घातला.
- ‘पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट’ या दहशतवादी संघटनेने घेतली राजौरी हल्ल्याची जबाबदारी
- शालेय अभ्यासक्रमात लवकरच होणार हे मोठे बदल; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा
- जेएससीएचे माजी अध्यक्ष अमिताभ चौधरी यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
- India Independence Day 2022 : “भारताने जे ठरवलं, ते पूर्ण करून दाखवले, आता ‘पंचप्राण’ संकल्प करायचाय”: पंतप्रधान मोदी