Facebook Meta Pay : मेटा (पूर्वीचे फेसबुक) ने बुधवारी आपल्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म 'फेसबुक पे'चे नाव बदलून 'मेटा पे' असे केले आहे. मेटाव्हर्ससाठी डिजिटल वॉलेट देखील लॉन्च केले. Metaverse द्वारे पेमेंट सुलभ करण्याच्या दिशेत कंपनीचे हे एक मोठे पाऊल आहे. याची घोषणा करताना कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, आज आम्ही फेसबुक पेचे नाव बदलून मेटा पे करत आहोत. याच्या मदतीने तुम्ही पूर्वीप्रमाणे खरेदी करू शकता, पैसे ट्रान्सफर करू शकता. तसेच, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, मेसेंजरवर चालवल्या जाणाऱ्या निधी उभारणी मोहिमेसाठी तुम्ही सहजपणे देणगी देऊ शकाल. जुन्या सुविधांमध्ये काही नवीन गोष्टींचाही समावेश करत आहोत, असे ते आपल्या पोस्टमध्ये म्हणाले.
तुमच्याकडे आता Metaverse साठी एक वॉलेट असेल जे सुरक्षितपणे तुमची ओळख, तुम्ही खरेदी करत असलेली माहिती आणि तुम्ही पैसे कसे भरता हे सर्व गोपनीय ठेवेल, असं ही या पोस्टमध्ये लिहिलं आहे. झुकरबर्ग पुढे म्हणाले की, भविष्यात अनेक प्रकारच्या डिजिटल वस्तू असतील, ज्या तुम्ही बनवू इच्छित असाल किंवा विकत घेऊ इच्छित असाल. जसे की डिजिटल आर्ट, व्हिडीओ, संगीत आणि बरेच काही. यात मालकीचा पुरावा आवश्यक असेल. Metaverse Wallet तुम्हाला यामध्ये मदत करेल. तुम्ही फक्त Metaverse मध्ये साइन इन केल्यास, त्यानंतर तुम्ही खरेदी केलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला एकाच ठिकाणी मिळेल. या प्रकारची इंटरऑपरेबिलिटी लोकांना चांगला अनुभव देईल. दरम्यान, मे महिन्याच्या सुरुवातीला कंपनीने घोषणा केली होती की, फेसबुक पे देखील मेटा ब्रँडिंगचा अवलंब करत आहे आणि लवकरच त्याचे नाव मेटा पे (Meta Pay) केले जाईल. फेसबुकने आपल्या अॅप इकोसिस्टमवर काम करण्यासाठी नोव्हेंबर 2019 मध्ये आपली पेमेंट प्रणाली सुरू केली.
- मोठी दुर्घटना; 39 जवानांसह नदीपात्रात कोसळली बस, 6 जणांचा मृत्यू
- भाजप आमदार सुभाष सिंह यांचं निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
- India Independence Day 2022 : “भारताने जे ठरवलं, ते पूर्ण करून दाखवले, आता ‘पंचप्राण’ संकल्प करायचाय”: पंतप्रधान मोदी
- चक्क पाकिस्तानचा झेंडा घरावर फडकवला...! व्हिडीओ व्हायरल, आरोपीला अटक