हैद्राबाद, येथील सैफाबादमध्ये प्राचीन नाण्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात 11935.8 ग्रॅम म्हणजेच तब्बल 12 किलोचे (12 kg) हे सोन्याचे नाणे कुतूहलाचा विषय होते. हे नाणे निजाम आठवा सम्राटाचे असल्याचे सांगण्यात येते. जहांगीर आणि मुकर्रम जाह यांना हे नाणे वारसा हक्काने मिळाल्याची माहिती आहे. एचकेच्या संचालक प्रोफेसर सलमा अहमद फारुकी यांच्या मते शेरवानी सेंटर फॉर डेक्कन स्टडीज, मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटीद्वारे अतिशय स्तुत्य उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. तिहास्कार आणि सीबीआय अधिकाऱ्यांनी मिळून दुर्मिळ नाण्यांच्या या प्रदर्शनासाठी पुढाकार घेतला आहे.
या प्रदर्शनात मुघल काळातले 12 नाणे अतिशय रहस्यमय आणि कुतूहलाचा विषय होते. जगातले हे सर्वात वजनी नाणे असून ते हैद्राबादच्या निजामांकडे वारसा हक्काने आले आहे. सीबीआयचे माजी सहसंचालक शंतनु सेन यांनी लिहिलेल्या ‘सीबीआय टेल्स फ्रॉम द बिग आय’ या पुस्तकात जगातल्या या रहस्यमयी नाण्याबद्दल विस्तृत माहिती देण्यात आली आहे. याशिवाय जहांगीर याने आपल्या आत्मचरित्रात दिलेल्या माहितीनुसार तुझुक-ए-जहांगीरी याने इराणचा राजदूत यादगार अलीच्या दरबारात भेट दिली. 10 एप्रिल 1612 रोजी अकबराचा मृत्यू झाल्याने एक शोक संदेश आणि 20.3 सेंटीमीटर व्यासाचे 12 किलो वजनाचे हे नाणे भेट म्हणून दिले अशी नोंद आहे. त्यानंतर हे नाणे हैद्राबादला कसे आले याबद्दल अजूनही गूढ कायम आहे.
भारताचा इतिहास पाहता सुमारे तीन हजार वर्षांपासून नाणी प्रचलित आहेत. अशी अतिप्राचीन नाणी या प्रदर्शनात पाहता पाहायला मिळाली. देशभरातून संग्राहक प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. उपलब्ध असलेल्या नाण्यांची ओळख, अंदाजे किंमत, वर्ष, इतिहास, त्यावरील अक्षरे, चित्र, ठसे याविषयीची माहिती नाणकशास्त्रातील तज्ज्ञांकडून सांगण्यात आली.
- ‘पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट’ या दहशतवादी संघटनेने घेतली राजौरी हल्ल्याची जबाबदारी
- India Independence Day 2022 : “भारताने जे ठरवलं, ते पूर्ण करून दाखवले, आता ‘पंचप्राण’ संकल्प करायचाय”: पंतप्रधान मोदी
- चक्क पाकिस्तानचा झेंडा घरावर फडकवला...! व्हिडीओ व्हायरल, आरोपीला अटक
- Electricity Amendment Bill 2022 : केंद्र सरकार आणणार वीज दुरुस्ती विधेयक;