नदीत सापडला भगवान रामाच्या सेतू पुलातील तरंगता दगड? एक्सपर्टने सांगितलं रहस्य

नदीत सापडला भगवान रामाच्या सेतू पुलातील तरंगता दगड?
एक्सपर्टने सांगितलं रहस्य

belgavkar.com | belgaum | belgavkar

श्रीरामपूरच्या गंगा घाटात 7 किलोचा तरंगता दगड

पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील श्रीरामपूरच्या गंगा घाटावर एक दुर्मिळ घटना घडलीय. श्रीरामपूरच्या गंगा घाटात 7 किलोचा तरंगता दगड सापडल्याची घटना समोर आली आहे. या दगडावर जय श्री राम लिहल्याचा व रामाच्या दगडी सेतू पुलातील दगडाशी संदर्भ लावला जात आहे. त्यामुळे या दगडाला पाहण्यासाठी राम भक्तांची एकचं गर्दी जमलीय. श्रीरामपूरच्या गंगा घाटावर 7 किलोचा तरंगता दगड सापडलाय. अनिकेत झा आणि मनोज सिंह या प्रत्यक्षदर्शींनी दोन दगडांवर जय श्री राम लिहिल्याचा दावा केला आहे. हा दगड हातात घेतल्यावर त्या दोन दगडांचे अंदाजे वजन 6 किंवा 7 किलो असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हा काळ्या रंगाचा दगड नदीत तरंगताना दिसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेय.  
स्थानिक रहिवासी अन्नपूर्णा दास यांनी सांगितले की, रामायण काळात भगवान श्री राम यांनी दगडांनी पूल बांधल्याबद्दल ऐकले होते, पण आज त्यांनी असा दगड प्रत्यक्षात पाहिला, जो पाण्यात तरंगताना दिसत होता. शास्त्रीय माहिती देताना पश्चिम बंगाल विज्ञान मंचचे ज्येष्ठ सदस्य चंदन देबनाथ म्हणाले की, दगडाची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असेल तर तो दगड पाण्यात तरंगताना दिसतो. याशिवाय कोणत्याही पूजेच्या वेळी थर्माकोलवर काळ्या सिमेंटचा लेप लावून अशी एखादी वस्तू नदीत वाहून नेल्यास त्या वस्तूच्या आतील पोकळीमुळे ती नक्कीच नदीत तरंगते, असेही त्यांचे म्हणणे आहे.
देबनाथ पुढे म्हणतात की, तथाकथित दगड पाहिल्याशिवाय आणि त्याची तपासणी केल्याशिवाय पाण्यात तरंगण्याबाबत नेमकेपणाने काहीही सांगता येणार नाही. दरम्यान अशा पाण्यात तरंगता दगड सापडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे. मात्र या घटनेतील दगडाचा ऐतिहासिक असा काही संदर्भ तज्ञांनी दिलेल्या माहितीतून समोर येत नाही आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

नदीत सापडला भगवान रामाच्या सेतू पुलातील तरंगता दगड? एक्सपर्टने सांगितलं रहस्य
श्रीरामपूरच्या गंगा घाटात 7 किलोचा तरंगता दगड

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm