netflix-lays-off-300-employees-as-bad-year-continues-to-hit-company-netflix-202206.jpg | Netflix : 'नेटफ्लिक्स' तोट्यात... 300 कर्मचार्‍यांना कामावरून काढलं | belgaum news | belgavkar बेळगावकर

Netflix : 'नेटफ्लिक्स' तोट्यात... 300 कर्मचार्‍यांना कामावरून काढलं

belgavkar.com | belgaum | belgavkar

सबस्क्रायबर्समध्ये मोठी घट, लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म Netflix

लोकप्रिय ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने (Netflix) चक्क 300 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. कंपनीला लागलेली घरघर याला कारणीभूत आहे. नेटफ्लिक्स कंपनीला झालेल्या तोट्यामुळे कंपनीने 300 कर्मचाऱ्यांना कामारून कमी केलं आहे. नेटफ्लिक्सच्या प्रवक्त्याने गुरुवारी यासंदर्भात माहिती देत सांगितलं आहे की, 'गेला काही काळ कंपनीला नुकसानाला सामोरं जावं लागलं आहे, उत्पन्नात घट झाली आहे. आम्ही व्यवसायात लक्षणीय गुंतवणूक करत आहोत. परिणामी आगामी काळात खर्च वाढत जातील. यामुळे कंपनीनं कर्मचाऱ्यांना काढण्याचा निर्णय घेतला आहे.'
कंपनीने वर्षाच्या मध्यात 300 कर्मचाऱ्यांनी कमी करताना म्हटलं आहे की, 'कर्मचाऱ्यांनी नेटफ्लिक्ससाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत आणि या कठीण काळात त्यांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.' कंपनी कर्मचाऱ्यांमध्ये कपात केल्याने याचा परिणाम 3 टक्के कर्मचाऱ्यावर झाला आहे. नेटफ्लिक्समध्ये सुमारे 11 हजार कर्मचारी आहे.
एप्रिल महिन्यामध्ये सबस्क्रायबर्समध्ये मोठी घट झाल्याची नेटफ्लिक्स कंपनीने सांगितलं आहे. ही दशकातील सर्वात मोठी घट आहे. यामुळे वॉल स्ट्रीटवर मोठा परिणाम झाला. शेअर बाजारात नेटफ्लिक्सच्या गुंतवणूकदारांना अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झालं आहे. या वर्षी कंपनीचा स्टॉक अंदाजे 70 टक्क्यांनी घसरला आहे. नेटफ्लिक्सकडे सध्या 221.6 दशलक्ष सबस्क्रायबर्स आहेत. गेल्या महिन्यातही नेटफ्लिक्सने महसूल वाढ कमी झाल्याचं कारण देत 150 कामगारांना कामावरून काढून टाकलं. नेटफ्लिक्सकडून प्लॅटफॉर्म पुन्हा रुळावर आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. 
नेटफ्लिक्सच्या एक अकाऊंट आणि पासवर्डचा वापर अनेक युजर्स करत असल्याचं समोर आलं आहे. यामुळे कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. पासवर्ड शेअरींगमुळे कंपनीच्या सबस्क्रायबर्समध्ये दशकातील सर्वात मोठी घट झाली आहे.