ओडिशाचे शालेय आणि जनशिक्षण मंत्री समीर रंजन दास आणि बालासोरचे आमदार स्वरूप कुमार दास यांना बालासोरमध्ये दुचाकीवर हेल्मेट न घातल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. मंत्र्यांना मागे बसवून आमदार बाईक चालवत होते. मंत्री आणि आमदार शाळांची पाहणी करणार होते. वाटेत त्यांना वाहतूक पोलिसांनी विना हेल्मेट पकडलं. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार स्वरूप कुमार दास हेल्मेटशिवाय दुचाकी चालवत होते. त्यांच्या मागे शिक्षणमंत्री समीर रंजन दास बसले होते. दोघांनीही हेल्मेट घातलं नव्हतं. ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलिसाने दुचाकी मालकाच्या नावावर एक हजार रुपयांचं चलन फाडलं आहे.
मंत्री महोदयांनी नंतर वाहतूक पोलीस स्टेशनला भेट देऊन दंड भरला. मंत्र्यांनी शहरातील विविध शाळांना अचानक भेटी दिल्या. त्यांनी आमदारांसह बालासोर टाऊन हायस्कूल आणि बाराबती गर्ल्स हायस्कूलला भेट दिली. यावेळी त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी त्यांच्या गरजांबाबत चर्चा करून शाळांमध्ये उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला.
दरम्यान या घटनेबाबत बोलताना आमदार स्वरूप दास म्हणाले, “कोणीही कायद्याच्या वर नाही. मंत्री समीर रंजन दास आणि मी बालेश्वरमधील विविध शाळांना अचानक भेट देण्यासाठी दुचाकीवरून प्रवास करत होतो. आम्ही हेल्मेट घातलं नव्हतं. हेमकपाडा चौक ओलांडल्यावर एका वृद्ध नागरिकाने ते आमच्या निदर्शनास आणून दिलं. यानंतर आम्ही आमची चूक मान्य केली. नियमानुसार आम्ही वाहतूक पोलीस ठाण्यात एक हजार रुपये दंड जमा केला. भविष्यात याची पुनरावृत्ती होणार नाही.'
- ‘पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट’ या दहशतवादी संघटनेने घेतली राजौरी हल्ल्याची जबाबदारी
- शालेय अभ्यासक्रमात लवकरच होणार हे मोठे बदल; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा
- India Independence Day 2022 : “भारताने जे ठरवलं, ते पूर्ण करून दाखवले, आता ‘पंचप्राण’ संकल्प करायचाय”: पंतप्रधान मोदी
- चक्क पाकिस्तानचा झेंडा घरावर फडकवला...! व्हिडीओ व्हायरल, आरोपीला अटक